मुंबई - सुख आणि आनंदाची अपेक्षा बाळगत अभिनेता विकी कौशलने आपला एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तो आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये बसलेला दिसत आहे.
चक्रीवादळ कोसळण्याची शक्यता असल्याने त्यांनी चाहत्यांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. 100 किमी प्रतितास वेगाने मुंबईच्या आसपास वाऱ्याचा वेग राहणार असून अलिबागमध्ये दरड कोसळण्याची शक्यता आहे. 32 वर्षीय अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर पाऊस पडण्यापूर्वी ढगांचे एक सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो खुर्चीवर बसलेला दिसतो, त्याचबरोबर तो काही खोल विचारात बुडलेला दिसतो. फोटोच्या कॅप्शनमध्ये विक्कीने लिहिले, "आशा आहे की हा पाऊस आनंद आणेल, नाट्य नाही. प्रत्येकाने सुरक्षित रहावे." "
- View this post on Instagram
Hoping these first showers only bring relief and joy and not too much drama. Stay safe guys! 🌧⚡️🌪
">
हेही वाचा - Live Update 'निसर्ग': थोड्याच वेळात अलिबाग किनारपट्टीवर धडकणार निसर्ग 'चक्रीवादळ'
वरुण धवन यांच्यासह अनेक सेलिब्रिटीज आणि युजर्सना त्याची पोस्ट आवडली आहे. फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्मवर याला 3.8 लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.
निसर्ग चक्रीवादळाचा प्रवास मुंबईच्या दिशेने निश्चित होत आहे. मुंबईतील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर पोलीस सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून नागरिकांना समुद्रकिनार्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले जात आहे. मुंबईतील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांची चिंता असून प्रशासन त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. नवी मुंबई मध्येच सोसाट्याचा वारा वाहील तसेच मुंबई शहरामध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
हेही वाचा - 'निसर्ग'ने घेतले रौद्ररुप, हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ काय म्हणाल्या वाचा...