ETV Bharat / sitara

HBD Ramesh Deo : हिंदी - मराठी चित्रपटसृष्टीतील महान 'देवा'चा वाढदिवस - unknown things about Ramesh Dev

हिंदी - मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता रमेश देव यांचा आज ९२ वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 190 मराठी चित्रपटांव्यतिरिक्त 285 हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या पत्नी सीमा देव यांच्यासोबत त्यांची असलेली ऑन लाईन आणि ऑफ लाईन केमेस्ट्री नेहमीच आदर्श राहिली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्य रमेश देव यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

अभिनेता रमेश देव
अभिनेता रमेश देव
author img

By

Published : Jan 30, 2022, 6:51 AM IST

मराठी चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ कलाकार आणि प्रख्यात हिंदी अभिनेता रमेश देव यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. अभिनेता-दिग्दर्शक-निर्मात्याने मराठी चित्रपटसृष्टीत सहा दशकांहून अधिक काळ आणि हिंदीमध्ये पाचपेक्षा जास्त काळ काम केले आहे. ३० जानेवारी १९२९ रोजी कोल्हापुरात जन्मलेले रमेश देव, आता त्यांच्या आयुष्याच्या दहाव्या दशकात आहेत. त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात राम राम पाव्हणं (१९५०) मधील एका छोट्या भूमिकेने केली. यात त्या काळातील लोकप्रिय आणि आघाडीचे अभिनेता चंद्रकांत होते.

रमेश देव
रमेश देव

त्यानंतर अभिनेता-चित्रपट निर्माता राजा परांजपे यांच्या आंधळा मागतो एक डोळा (1956) मध्ये मुख्य खलनायकाच्या भूमिकेत रमेश देव यांना पहिला मोठा ब्रेक मिळाला. दशकाच्या अखेरीस त्यांनी स्वतःला एक प्रमुख अभिनेता म्हणून प्रस्थापित केले होते. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या. पण 1960 च्या दशकाच्या मध्यापर्यंत रमेश देव यांनी सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या. मोहब्बत इसको कहते हैं (1965) द्वारे हिंदी सिनेमात ऑफर मिलाल्यानंतर त्यांचे मोठ्या कॅनव्हासकडे लक्ष वेधले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 190 मराठी चित्रपटांव्यतिरिक्त 285 हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

आनंदमधील एका सीनमध्ये राजेश खन्नासोबत रमेश आणि सीमा देव

आनंद चित्रपटातील करिअर बदलून टाकणारी भूमिका:

या सुखानो या या आत्मचरित्रात रमेश देव यांनी 1970 च्या दशकातील हृषिकेश मुखर्जीच्या आनंद (1971) या सर्वात अविस्मरणीय चित्रपटामुळे त्यांची आणि त्यांची पत्नी अभिनेत्री सीमा यांनी यांच्या कारकिर्दीची व्याख्या कशी बदलली याबद्दल सांगितले. रमेश देव हेमंत कुमारच्या बीस साल पहले (1972) चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेचे शूटिंग करत होते. ते अंधेरी (पश्चिम) येथील फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये शूटिंग करत होते आणि त्यांना एक लांब दृश्य सादर करायचे होते ज्यामध्ये अनेक संवाद आणि हालचाली होत्या. रमेश देव यांनी पहिल्या टेकमध्येच सीन ओके केला.

आनंदमधील एका सीनमध्ये अमिताभ बच्चनसोबत रमेश आणि सीमा देव

हे पाहून एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आला आणि त्याच्या कामगिरीचे कौतुक केले. निर्माता-गायक हेमंत कुमार त्यांच्यात सामील झाले आणि त्यांनी रमेश देव यांच्या मराठी चित्रपटातील कामाबद्दल अनोळखी व्यक्तीला सांगितले. काही दिवसांनंतर रमेश देव यांना फोन आला आणि त्यांना दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता रूपम चित्र येथे निर्माता एनसी सिप्पी यांना भेटायला येण्यास सांगितले. रमेश देव कोणत्याही बैठकीला उशीर करत नसत. त्या दिवशी ते ठरलेल्या वेळेच्या अर्धा तास आधी पोहोचले. खोलीत प्रवेश केला तेव्हा सेटवर आधी भेटलेला अनोळखी व्यक्ती तिथेच होता. तेव्हा तो अनोळखी व्यक्ती दुसरे कोणी नसून चित्रपट निर्माते हृषिकेश मुखर्जी असल्याचे कळले. मुखर्जींनी देव आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये डॉक्टर प्रकाश कुलकर्णी आणि सुमन कुलकर्णी या विवाहित जोडप्याच्या भूमिकेची ऑफर दिली. वास्तविक जीवनातील जोडप्याने तब्बल 73 चित्रपटांमध्ये पती-पत्नीची भूमिका साकारली आहे, परंतु आनंद त्यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे.

गोल्डन कपल: रमेश आणि सीमा देव
गोल्डन कपल: रमेश आणि सीमा देव

मराठी चित्रपटसृष्टीतील गोल्डन कपल:

रमेश आणि सीमा देव हे कदाचित मराठी चित्रपटसृष्टीतील ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीनचे सर्वात प्रसिद्ध जोडपे आहेत. तरीही उत्सुकतेची गोष्ट म्हणजे दोघांनीही मराठीपेक्षा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण महत्त्वाचा फरक असा आहे की मराठी सिनेमात ते अनेकदा लीड रोल साकारायचे, तर हिंदी सिनेमात त्यांना काहीवेळा दुय्यम भूमिका कराव्या लागल्या.

हेही वाचा - देवाबद्दलच्या वादग्रस्त विधानानंतर श्वेता तिवारीने मागितली माफी

रमेश आणि सीमा देव यांची प्रेमकहाणी:

गोल्डन कपल: रमेश आणि सीमा देव
गोल्डन कपल: रमेश आणि सीमा देव

हा तो काळ होता जेव्हा नलिनी सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवायला सुरुवात केली होती. नलिनीने यांनी रुपेरी पडद्यासाठी त्यांचे नाव 'सीमा' ठेवले. त्यांनी 1960 मध्ये त्यांनी जगाच्या पाठीवर या चित्रपटातून मनोरंजन उद्योगात पदार्पण केले. या चित्रपटामध्ये रमेश देव देखील होते. या चित्रपटातून दोघांची ओळख झाली. त्यानंतर जवळपास दोन दशके रमेश आणि सीमा अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आणि प्रेक्षकांना दोघांची जोडी खूप आवडली. याच काळात दोघांनी 1962 मध्ये 'वरदक्षिणा' हा चित्रपट केला होता. चित्रपटाच्या कथानकानुसार रमेश यांचे पात्र सीमाला दुसऱ्या पुरुषाशी लग्न करण्यास मदत करताना प्रेमात पडते. हा तोच चित्रपट होता ज्यातून दोघांनाही एकमेकांबद्दलचे प्रेम वाटू लागले आणि त्याच वर्षी दोघांनीही नात्याला विलंब न लावता लग्न केले.

रमेश आणि सीमा देव
रमेश आणि सीमा देव

रमेश देव बद्दल काही अज्ञात गोष्टी

रमेश देव यांच्या पालकांची इच्छा होती की त्यांनी सैन्यात भरती व्हावे.

त्यांचे वडील पृथ्वीराज कपूरचे खूप चाहते असल्याने, त्यांनी एकदा पृथ्वीराज कपूरच्या चित्रपटाच्या सेटवर तरुण रमेशला सोबत नेले होते. शेवटच्या क्षणी एक बालकलाकार दिसला नाही म्हणून दिग्दर्शक रमेशकडे गेला आणि त्याला विचारले ‘क्यू बे तू काम करेगा क्या?’ (अभिनय कराल का?). रमेश यांनी होकार दिला आणि त्यामुळे बालकलाकार म्हणून त्यांना पहिला ब्रेक मिळाला.

रमेश देव यांनी 'पाटलाची पोर'मध्ये पदार्पण कॅमिओ करून सहा दशके झाली आहेत. या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी 150 हून अधिक मराठी आणि 200 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

त्यांनी 350 हून अधिक चित्रपट केले आहेत. तीन चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारली जी समीक्षक आणि व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरली.

त्यांनी दूरदर्शन मालिका केल्या आहेत. अनेक नाटकांची निर्मिती केली आहे. 1000 हून अधिक रंगमंचावर अभिनय सादर केला आहे आणि एक यशस्वी जाहिरात फिल्म एजन्सी चालवली आहे.

रमेश देव यांची पत्नी सीमा देव यांच्यासोबतच्या केमिस्ट्रीमुळे त्यांनी जवळपास ७५ मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये सहकलाकार म्हणून काम केले.

हेही वाचा - तरुणांनी ध्येयवादी राहणे आवश्यक, अभिनेते रमेश देव यांचे आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.