मुंबई (महाराष्ट्र) - हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री शबाना आझमीने ( Shabana Azmi ) कर्नाटकात सध्या सुरू असलेल्या हिजाबच्या वादावर ( Hijab row ) अभिनेत्री कंगना रणौतने ( Kangana Ranaut ) नुकत्याच दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तिला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी द्यायची की नाही यावरून कर्नाटकात भडकलेल्या वादावर कंगनाने गुरुवारी आपले मत मांडले होते.
कंगनाने शास्त्रज्ञ आणि लेखक आनंद रंगनाथन यांची एक पोस्ट शेअर केली आणि इंस्टाग्रामवर लिहिले: "जर तुम्हाला हिंमत दाखवायची असेल तर अफगाणिस्तानात बुरखा न घालून दाखवा. स्वत:ला पिंजऱ्यात ठेवू नका, मोकळे व्हायला शिका."
-
Correct me if Im wrong but Afghanistan is a theocratic state and when I last checked India was a secular democratic republic ?!! pic.twitter.com/0bVUxK9Uq7
— Azmi Shabana (@AzmiShabana) February 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Correct me if Im wrong but Afghanistan is a theocratic state and when I last checked India was a secular democratic republic ?!! pic.twitter.com/0bVUxK9Uq7
— Azmi Shabana (@AzmiShabana) February 11, 2022Correct me if Im wrong but Afghanistan is a theocratic state and when I last checked India was a secular democratic republic ?!! pic.twitter.com/0bVUxK9Uq7
— Azmi Shabana (@AzmiShabana) February 11, 2022
शुक्रवारी शबानाने ट्विटरवर कंगनाला प्रश्न विचारला. शबानाने लिहिले: "मी चुकीचे असल्यास मला दुरुस्त करा पण अफगाणिस्तान हा एक धार्मिक कायदे मानणारा देश आहे आणि मी जेव्हा शेवटचे तपासून पाहिले तेव्हा भारत धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक होता?!!"
कर्नाटक सरकारने 5 फेब्रुवारी रोजी "समानता, अखंडता आणि सार्वजनिक कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणार्या" कपड्यांवर बंदी घालून सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ड्रेस कोड अनिवार्य करणारा आदेश जारी केल्यानंतर कर्नाटकातील वादाला तोंड फुटले. उडुपी जिल्ह्यातील सरकारी गर्ल्स पीयू कॉलेजमधील विद्यार्थिनींना मुस्लिम महिला परिधान करीत असलेला हिजाब परिधान केल्यामुळे प्रवेश नाकारण्यात आला होता.