ETV Bharat / sitara

..म्हणून कोणत्याही प्रसिद्ध अभिनेत्यासोबत काम करणं टाळते कंगना

अनेक चित्रपटांत ती कोणत्याही प्रसिद्ध अभिनेत्याशिवाय दिसली आणि तिचे हे सिनेमे हीटदेखील ठरले. यात क्वीन, तनु वेड्स मनु, तनु वेड्स मनु २ आणि मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झासी या सिनेमांचा समावेश आहे.

कंगना रनौत
author img

By

Published : Aug 31, 2019, 5:11 PM IST

मुंबई - बॉलिवूड क्वीन, वन वूमन आर्मी अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या कंगनाने काही काळातच लोकप्रियतेचे शिखर गाठले. महेश भट्ट यांच्या गँगस्टर सिनेमातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटानंतर कंगनाने कधीही मागे वळून पाहिले नाही.

अनेक चित्रपटांत ती कोणत्याही प्रसिद्ध अभिनेत्याशिवाय दिसली आणि तिचे हे सिनेमे हीटदेखील ठरले. यात क्वीन, तनु वेड्स मनु, तनु वेड्स मनु २ आणि मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी या सिनेमांचा समावेश आहे. नुकतंच एका मुलाखतीत कंगनाने कोणत्याही प्रसिद्ध अभिनेत्यासोबत काम न करण्यामागचं कारण सांगितलं आहे.

क्वीनसारखी तुला मिळालेली नावे तुला या अभिनेत्यांसोबत काम करण्यापासून थांबवतात का? असा सवाल केला असता कंगना म्हणाली, मला असं वाटत नाही. आपल्याला जे ध्येय गाठायचे आहे, किंवा ठरवलेली एखादी गोष्ट करायची आहे, तेव्हा या गोष्टीने काहीही फरक पडत नाही. मला कधीच अशी अभिनेत्री बनायचं नव्हतं, जी केवळ हिरोची साथ देणारी सहकलाकार असेल आणि जेव्हा तुम्ही प्रसिद्ध अभिनेत्यासोबत काम करता, तेव्हा तुम्ही फक्त एक साईड अॅक्टर राहता, असं कंगना यावेळी म्हणाली.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.