मुंबई - संजय दत्तच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आगामी अॅक्शन थ्रिलर 'केजीएफ चॅप्टर २' च्या नव्या पोस्टरचे अनावरण केले आहे. बुधवारी रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये संजय दत्त या चित्रपटात साकारत असलेल्या व्यक्तीरेखेचा लूक पाहायला मिळतो.
संजय दत्तने आपल्या वाढदिवसाला ही अनोखी भेट दिल्याबद्दल निर्मात्याचे आभार मानले आहेत. त्याने इन्स्टाग्रामवरुन हे पोस्टर शेअर करुन आभार व्यक्त केले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
"या चित्रपटावर काम केल्यामुळे मला आनंद झाला आणि मी वाढदिवसाच्या दिवशी याहून अधिक चांगल्या गिफ्टचा विचार करु शकलो नसतो," असे म्हणत चित्रपटाच्या निर्मात्यासह टीमचे आभार मानले आहेत.
"माझ्या सर्व चाहत्यांचे विशेष आभार ज्यांनी नेहमीच त्यांच्या प्रेमाचे आणि समर्थनाचे प्रदर्शन केले आहे! # केजीएफसीएफटर 2 #अधिरा फर्स्ट लूक," असे संजय दत्तने चाहत्यांचे आभार मानताना लिहिले आहे.
'केजीएफ : चॅप्टर 2' या चित्रपटात संजय दत्तचा एक अनोखा अवतार पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात तो खलनायक साकारत आहे.
हेही वाचा - सुशांतसिंगच्या कंपन्यांमध्ये रिया आणि तिच्या भावाने अनियमितता केल्याची शक्यता -बिहार पोलिसांचा तपास
केजीएफ या चित्रपटाच्या पहिल्या भागात कन्नड अभिनेता यश अत्यंत करारी भूमिकेत दिसला होता. या अॅक्शन चित्रपटामुळे तो देशभर लोकप्रिय झाला. त्याच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा चाहते करीत आहेत. या चित्रपटात रॉकी (यश) आणि अधीरा (संजय) यांच्या जोरदार संघर्षाचा थरार पाहायला मिळणार आहे.
प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटात श्रीनिधी शेट्टी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचा पहिला भागही नीलने दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट येत्या 23 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.