ETV Bharat / sitara

मकर संक्रांतीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार 'हाथी मेरे साथी' - Pulkit Samrat

'हाथी मेरे साथी' हा चित्रपट २०२१ मध्ये मकर संक्रांतीला रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटात राणा डग्गुबाती आणि पुलकित सम्राट मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

hathi-mere-saath
'हाथी मेरे साथी'
author img

By

Published : Oct 21, 2020, 6:51 PM IST

मुंबई - 'हाथी मेरे साथी' हा साहसी चित्रपट पुढील वर्षी मकर संक्रांतीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राणा डग्गुबाती आणि पुलकित सम्राट मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

बुधवारी पुलकितने इन्स्टाग्रामवर आपल्या अकाउंटवर चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी माहिती शेअर केली.

त्याने लिहिलंय, “ज्या प्रकारे आज आपण एक प्राणघातक साथीचा सामना करीत आहोत, तसेच आपल्या जंगलांनाही अशाच प्रकारची समस्या भेडसावत आहे. मानवी अतिक्रमण आणि जंगलतोड ही मोठी समस्या आहे. माणसे जंगलावर वर्चस्व गाजवत आहेत. 'हाथी मेरे साथी' समवेत या रोमांचकारी संघर्षाचा एक भाग व्हा. २०२१ मध्ये मकर संक्रांतीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. "

पुलकितने चित्रपटाच्या मोशन पिक्चरसह आपले पत्र शेअर केले असून त्यामध्ये तो आणि राणा डग्गुबातीसोबत जंगलाच्या पार्श्वभूमीवर हत्तींच्या कळपासह दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.