ETV Bharat / sitara

हर्षवर्धन राणेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह - Harshvardhan Rane become corona positive

अभिनेता हर्षवर्धन राणे याने आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची बातमी सोशल मीडियावरून कळवली आहे. तो १० दिवस आयसोलेशनमध्ये राहणार आहे.

Harshvardhan Rane
हर्षवर्धन राणे
author img

By

Published : Oct 6, 2020, 7:32 PM IST

मुंबई - अभिनेता हर्षवर्धन राणे याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तो १० दिवस आयसोलेशनमध्ये जात असल्याचे त्यानेच सांगितले आहे. हर्षवर्धनने एक नोट लिहून ही बातमी चाहत्यांना दिली आहे.

हर्षवर्धन लिहितो, ''माझ्या प्रिय साथीदारांनो, मला ताप आणि पोटदुखी होती. यासाठी सल्ला घेण्यासाठी मी रुग्णालयात गेलो. त्यांनी सांगितले की, हा व्हायरल फिव्हर असेल, कारण माझे फुफ्फुस व्यवस्थित आहे आणि दुसरी काही लक्षणे नाहीत. त्यानंतर मी कोविड टेस्ट केली.''

त्याने लिहिलंय, 'मी कोरोना पॉझिटिव्ह ठरलो आहे. तर, आता मला १० दिवस आयसोलेशनमध्ये रहावे लागणार आहे. माझ्याजवळ एक चांगली बातमी होती. परंतु आता त्यासाठी १० दिवस थांबावे लागेल. लवकरच भेटेन एका चांगल्या बातमीसह आणि उत्तम आरोग्यासह.''

पोस्टच्या शेवटी त्याने गमतीच्या सूरात लिहिलंय, ''काळजी करू नका आणि मला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे विनोद पाठवू नका. फक्त प्रेम द्या.''

बेजॉय नॉम्बियार यांच्या आगामी 'तैश' चित्रपटात हर्षवर्धन काम करीत आहे. यात पुलकित सम्राट, कृती खरबंदा आणि जिम सरभ दिसणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.