ETV Bharat / sitara

गुरू दत्त यांचा बायोपिक मोठ्या पडद्यावरच रिलीज केला जाऊ शकतो - भावना तलवार - दिग्दर्शिका भावना तलवार

भारतीय सिनेमाचा महान नायक गुरू दत्त यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याचे दिग्दर्शिका भावना तलवार यांनी ठरवले आहे. यासाठी त्या गेली सात वर्षे कथेवर काम करीत होत्या. हा एक जबरदस्त आयुष्य असलेला चित्रपट असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Guru Dutt's biopic c
गुरू दत्त यांचा बायोपिक
author img

By

Published : Sep 7, 2020, 1:27 PM IST

मुंबई - राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शिका भावना तलवार दिग्गज आयकॉनिक फिल्ममेकर आणि अभिनेता गुरुदत्त यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन करणार आहेत. बायोपिकचे नाव 'प्यासा' आहे. तलवार आपल्या चित्रपटासाठी कलाकारांची निवड करण्याच्या विचारात आहेत. गुरू दत्तचे आयुष्य तीव्र आणि गुंतागुंतीचे आहे, म्हणून तलवार यांना ही कहाणी लिहिण्यास सात वर्षे लागली. तरीही हा बायोपिक वेब सीरिज स्वरूपात कथन करण्याऐवजी त्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून मांडायचे ठरवले आहे.

तलवार यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, "त्यांचे व्यक्तिमत्त्व 'लार्जर दॅन लाईफ होते'. १० वर्षाच्या आतच त्यांनी एक निर्माता, अभिनेता, चित्रपट व्यवसायिक म्हणून यश मिळवले. चाहत्यांची भरपूर प्रेम त्यांना लाभले होते. गीता दत्तशी प्रेम आणि पत्नी म्हणून झालेला स्वीकार, असे सर्व काही त्यांना मिळाले होते. यासोबत तद्यांनी दुःखही पाहिले होते. हे सर्व छोट्या पडद्यावर दाखवणे शक्य नाही. हा एक फिचर फिल्मचा विषय आहे.''

त्या पुढे म्हणाल्या, "कथेला १० तासाची कथा म्हणून सादर करण्याची गरज नाही. त्यांचा प्रवास खूपच आकर्षक आणि मोठ्या पडद्यावर दाखविण्यासारखा आहे. सविस्तर संशोधन कार्य करण्यासाठी आणि एक आकर्षक कथा लिहिण्यास मला सात वर्षे लागली. यासाठी बर्‍याच चर्चा झाल्या, ज्या मला आणि माझ्या टीमलाच नाही तर प्रेक्षकांच्या नव्या पिढीलाही आवडतील आणि त्यांना चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जायला आवडेल. ”

गुरू दत्त यांच्या टेलिफोन ऑपरेटर ते भारतीय सिनेमाचा एक प्रमुख या अद्भूत प्रवासाची कथा या चित्रपटात मांडली जाणार आहे.

त्या पुढे म्हणाल्या, "त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन कसे जुळले होते ही एकरंजक गोष्ट आहे. 'बाजी' चित्रपटादरम्यान ते गीता दत्तला भेटले आणि दोघे नवोदित स्टार बनले आणि पुढे त्यांचे लग्न झाले, आणि त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन एकमेकांकडे झुकले. हा एक अतिशय मनोरंजक प्रवास आहे. "

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.