ETV Bharat / sitara

'गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल'पोस्टर रिलीज, 'या' दिवशी होणार रिलीज

author img

By

Published : Feb 18, 2020, 3:02 PM IST

निर्माता करण जोहरने 'गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल' या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज केले आहे. दिग्दर्शक शरन शर्मा यांचे दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनअंतर्गत करण्यात आली आहे.

Gunjan Saxsena The Kargil girl
गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल

मुंबई - कारगिल युद्धात आपल्या शौर्याने सर्वांना भारावुन टाकणाऱ्या लढवय्या गुंजन सक्सेना यांच्या पराक्रमाची कथा उलगडणारा 'कारगिल गर्ल' हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज झाले आहे.

या चित्रपटात अभिनेत्री जान्हवी कपूर ही भारतीय वायु दलातील वैमानिकाच्या भूमिकेत झळकणार आहे. गुंजन सक्सेना यांची भूमिका ती साकारणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक देखील प्रदर्शित झाला आहे.

'गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल' हा चित्रपट दिग्दर्शक शरन शर्मा हे करत आहेत. तर, या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत करण्यात येणार आहे.

हा चित्रपट २४ एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होईल.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.