मुंबई - खिलाडी कुमार अक्षयने तो कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे कळवले होते. त्याच्या पाठोपाठ त्याचा ‘भागम भाग’ चा ‘पार्टनर’ गोविंदा सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह झालाय. अक्षय आणि गोविंदा ‘हॉलिडे’ मध्येसुद्धा एकत्र होते. गेले वर्ष अनेकांना कोरोना झाला. परंतु त्यांच्यात मनोरंजनसृष्टीतील फार कमी जण होते. अनलॉक फेजमध्ये चित्रपट आणि मालिकांच्या शुटिंग्सना परवानगी मिळाली. मात्र, त्यानंतर काही महिने सुरळीतपणे गेल्यानंतर शूटिंगच्या सेटवरून कोरोनाबाधित कलाकारांची नावे समोर आली.
अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अर्जुन कपूर, वरुण धवन, मलाईका अरोरा, नीतू कपूर, कार्तिक आर्यन आदींना कोरोना झाल्यानंतर कोरोना च्या दुसऱ्या लाटेत बॉलिवूड कलाकार अधिक प्रमाणात दिसून येताहेत. रणबीर कपूर, आलिया भट, मनोज बाजपेयी, सतीश कौशिक, तारा सुतारीया, सिद्धांत चतुर्वेदी, भप्पी लाहिरी, परेश रावल, आर माधवन, आमिर खान अशा अनेक सेलिब्रिटीज कोरोना पॉझिटिव्ह लिस्टमध्ये सामील झाल्या आहेत.
गोविंदाच्या सेक्रेटरीने अवगत केले की, ‘सर्व प्रकारची काळजी घेऊनही त्यांना कोरोनाने गाठलेच. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत व ते घरीच विलगीकरणात आहे. तसेच सुनीता (गोविंदाची धर्मपत्नी) यांनी सर्वांना, खबरदारीचा उपाय म्हणून, आपली कोरोना टेस्ट करून घेण्याची विनंती केली. जे गेल्या काही दिवसांत गोविंदाच्या सान्निध्यात आले होते.’
गोविंदा, अक्षय कुमार आणि आमिर खानपासून आलिया भट्ट ते रणबीर कपूरपर्यंत कोव्हीड-१९ च्या दुसर्या लाटेमुळे अनेक बॉलिवूड सेलेब्स प्रभावित झाले असून सर्वांनीच स्वतःची काळजी घ्यावी, ही विनंती त्यांनी सर्वांना केली आहे.
हेही वाचा - VIDEO : तरुणाला होळीमध्ये ढकलत हत्येचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल
अक्षय कुमारचा ‘भागम भाग’ चा ‘पार्टनर’ गोविंदा सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह - अभिनेता गोविंदाला कोरोनाची लागण
अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अर्जुन कपूर, वरुण धवन, मलाईका अरोरा, नीतू कपूर, कार्तिक आर्यन आदींना कोरोना झाल्यानंतर कोरोना च्या दुसऱ्या लाटेत बॉलिवूड कलाकार अधिक प्रमाणात दिसून येताहेत. अभिनेता गोविंदालाही कोरोनाची लागण झाली आहे.