मुंबई - सलमानचा बहुप्रतीक्षित 'दबंग ३' चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याच्या चाहत्यांमध्ये सिनेमाबद्दलची उत्कंठा वाढली आहे. या चित्रपटाच्या क्लायमॅक्सची सध्या जोरदार चर्चा असून यात सलमान आणि खलनायक असलेल्या किचा सुदिप यांच्यात जोरदार हाणामारी होणार आहे. विशेष म्हणजे सलमान एकटा असेल आणि सुदिपसोबत ५०० जणांची फलटण असेल.
मिळालेल्या माहितीनुसार शेवटच्या फाईटमध्ये सलमान साकारत असलेल्या चुलबूल पांडे आणि किचा सुदिप साकारत असलेल्या बाली यांच्यात तुफान फाईट होणार आहे. अशी अॅक्शन यापूर्वी सलमानच्या कोणत्याही चित्रपटात यापूर्वी पाहायला मिळाली नव्हती. या सीन्समध्ये शेकडो गाड्या वापरण्यात आल्या आहेत, असे सिनेमाशी संबंधित व्यक्तीने सांगितले.
'दबंग ३' चे दिग्दर्शन प्रभू देवा यांनी केले असून सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान, अमोल गुप्ते, माही गिल आणि टीनू आनंद यांच्या भूमिक आहेत. प्रिती झिंटा हिची यात एक छोटी झलक असून महेश मांजरेकरांची मुलगी सई महत्त्वाची भूमिकेत आहे.
'दबंग ३' येत्या २० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">