मुंबई (महाराष्ट्र) - सुपरस्टार सलमान खानच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त जेनेलिया देशमुख पार्टीत हजर होती. या ठिकाणी उत्तम वागणूक मिळाल्याबद्दल तिने सलमानचे आभार मानले आहेत. सोमवारी जेनेलियाने इंस्टाग्रामवर सलमानसोबत डान्स करीत असतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये दोघांनीही मनसोक्त डान्स केल्याचे दिसत आहे.
व्हिडिओमध्ये दोघेही मरून टी-शर्टमध्ये ट्विनिंग करताना दिसत आहेत. "सर्वात मोठ्या हृदयाच्या माणसाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. देव तुम्हाला खूप आनंद, प्रेम आणि उत्तम आरोग्य देवो. आम्ही तुमच्यावर प्रेम करतो - आज भाईचा वाढदिवस आहे, " असे तिने पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सलमान आणि जेनेलियाच्या या व्हिडीओने नेटिझन्स अवाक झाले आहेत. क्लिपवर प्रतिक्रिया देताना एका सोशल मीडिया युजरने लिहिलंय, "खूप गोड. लव्ह यू सलमान". आणखी एकाने लिहिले, "सर्वोत्तम व्हिडिओ. सलमान नेहमी असाच हसत राहो."
सलमान आणि जेनेलियाने 'जय हो'मध्ये एकत्र काम केले आहे. या चित्रपटात जेनेलियाचा कॅमिओ रोल होता.
वाढदिवसापूर्वी सलमानला साप चावल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि, साप विषारी नसल्यामुळे अभिनेत्याला काही तासांनंतर रुग्णालयातून सोडण्यात आले. बरे झाल्यानंतर सलमानने त्याच्या पनवेल फार्महाऊसच्या बाहेर मीडियाला अभिवादन केले.
हेही वाचा - '83' पाहून रजनीकांत प्रभावित, केले संपूर्ण टीमचे अभिनंदन!!