मुंबई - अभिनेता अर्जुन रामपालने बुधवारी सोशल मीडियावर आपली गर्लफ्रेंड गॅब्रिएला डीमेट्रिएड्सचे दोन फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये गॅब्रिएलाने परिधान केलेला शर्ट अर्जुनचा आहे. या फोटोमध्ये गॅब्रिएला आपला मुलगा अरिकबरोबर रस्त्यावर फिरताना दिसत आहे. अर्जुनने फोटोच्या खॅप्शनमध्ये लिहिले आहे, "जेव्हा ती आमच्या मुलाला फिरायला घेऊन जाते तेव्हा ती माझा शर्ट उधार घेते."
अभिनेता अर्जुन रामपाल सध्या गॅब्रिएला आणि त्याच्या मुलासह बुडापेस्टमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या प्रवासाविषयी माहिती देताना अर्जुनने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले होते, "मी कामावर जाण्यापूर्वी, कुटुंबासमवेत काही क्वालिटी टाईम.."
कामाचा विचार करता अर्जुन आगामी ‘धाकड’ चित्रपटात रुद्रवीर या खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यात मुख्य भूमिकेत कंगना रणौतचीही भूमिका आहे. या भूमिकेसाठी त्याने आपल्या केसांचा रंग प्लॅटिनम गोरा बनवला आहे.
‘धाकड’ या स्पाय थ्रिलर चित्रपटा व्यतिरिक्त अर्जुन लवकरच रमेश थेटे दिग्दर्शित ‘ द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या ऐतिहासिक चित्रपटातही दिसणार आहेत.
हेही वाचा - मराठी मनोरंजनाचा पेटारा उलगडला, प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च