ETV Bharat / sitara

इतिहासात पहिल्यांदा मराठी दिग्दर्शकाचे नाव विमानावर छापले - Jhundpromotion on the plane

इतिहासात अगदी प्रथमच कोणत्या मराठी दिग्दर्शकाच्या चित्रपटाचे नाव विमानावर छापले गेले आहे.. ते नाव आहे नागराज पोपटराव मंजुळे....चांगभलं., अशी पोस्ट राम पवार यांनी सोशल मीडियावर करीत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

मराठी दिग्दर्शकाचे नाव विमानावर छापले
मराठी दिग्दर्शकाचे नाव विमानावर छापले
author img

By

Published : Mar 21, 2022, 4:30 PM IST

मुंबई - राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळेंच्या 'झुंड' चित्रपटावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करीत आहेत. अजूनही हा चित्रपट अनेक थिएटर्समध्ये जोरदार प्रदर्शन करीत आहे. या चित्रपटाचे प्रमोशन संथगतीने असले तरी जोरदार होताना दिसत आहे. स्पाइसजेट एअरवेजने 'झुंड' चित्रपटाचे प्रमोशन विमानावर केले आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहे.

स्पाइसजेट विमानावर झुंडचे प्रमोशन
स्पाइसजेट विमानावर झुंडचे प्रमोशन

नागराज मंजुळेंचे मित्र असलेल्या राम पवार यांनी आपल्या फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केलाय. त्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय, ''इतिहासात अगदी प्रथमच कोणत्या मराठी दिग्दर्शकाच्या चित्रपटाचे नाव विमानावर छापले गेले आहे.. ते नाव आहे नागराज पोपटराव मंजुळे....चांगभलं.''

स्पाइसजेट विमानावर झुंडचे प्रमोशन
स्पाइसजेट विमानावर झुंडचे प्रमोशन

या व्हिडिओ नागराज मंजुळेसह कलाकारांची टीम मुंबई विमानतळावर पोहोचलेली दिसते. जेट एअरवेजच्या बसमधून हे सर्वजण धाव पट्टीवर जाताना दिसतात. तिथे एक विमान थांबले आहे आणि त्यावर लाल रंगाचा पडदा झाकलेला दिसतो. थोड्यावेळात हा पडदा सरकतो आणि झुंडचे मोठे पोस्टर विमानवर झळकते. झुंडच्या टायटल ट्रॅकवर सर्वजण जल्लोष करताना व्हिडिओत दिसतात.

स्पाइसजेट विमानावर झुंडचे प्रमोशन
स्पाइसजेट विमानावर झुंडचे प्रमोशन

हा व्हिडिओ कधीचा आहे याचा उल्लेख राम पवार यांनी केलेला नाही. राम हे नागराजचे मित्र असून ते नेहमी अण्णाचे कौतुक करताना थकत नाहीत. या व्हिडिओतूनही हे प्रेम पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.

हेही वाचा -'सेल्फी'च्या शूटिंगसाठी अक्षय कुमार भोपाळमध्ये दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.