ETV Bharat / sitara

फर्स्ट विकेंडमध्ये 'जबरिया जोडी'नं जमवला इतका गल्ला - मिशन मंगल

पहिल्याच दिवशी या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात झाली होती. मात्र शनिवार आणि रविवारी सुट्टीचा फायदा चित्रपटाच्या कलेक्शनला होईल, असा अंदाज वर्तवला जात होता.

'जबरिया जोडी'नं जमवला इतका गल्ला
author img

By

Published : Aug 12, 2019, 5:24 PM IST

मुंबई - सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा यांच्या मुख्य भूमिका असलेला 'जबरिया जोडी' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या सिनेमाला समिक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा अपयशी ठरला.

चित्रपटानं पहिल्या विकेंडमध्ये म्हणजेच तीन दिवसात ११ कोटींची कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात झाली होती. मात्र शनिवार आणि रविवारी सुट्टीचा फायदा चित्रपटाच्या कलेक्शनला होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. हा अंदाजही काहीसा चुकीचा ठरला असून चित्रपटानं विकेंडपर्यंत केवळ ११ कोटींचा गल्ला जमावला आहे.

तर १५ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर 'बाटला हाऊस' आणि 'मिशन मंगल' या दोन बहुचर्चित सिनेमांसोबत या चित्रपटाची टक्कर होणार असल्यानं 'जबरिया जोडी'साठी हा आठवडा काहीसा कठीण असणार आहे. बिहारच्या पकडवा विवाह पद्धतीवर आधारित असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन प्रशांत सिंग यांनी केलं आहे.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.