ETV Bharat / sitara

‘हिरोपंती २’च्या शुटिंगचे पहिले सत्र मुंबईत पार पडले - Tiger Shroff's upcoming film

साजिद नाडियादवाला निर्मित ‘हिरोपंती २’ च्या शुटिंगचे पहिले सत्र मुंबईत पार पडले. या चित्रपटात टायगर श्रॉफचे भरपूर अॅक्शन सीन्स असणार आहेत. ३ डिसेंबर २०२१ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. परंतु सध्या वाढत असलेल्या कोरोना केसेस यामुळे हा चित्रपट वेळेत पूर्ण होईल का याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहे.

first schedule of shooting of 'Hiropanti 2'
‘हिरोपंती २’च्या शुटिंगचे पहिले सत्र मुंबईत पार पडले
author img

By

Published : Apr 8, 2021, 5:33 PM IST

मुंबई - अॅक्शन स्टार टायगर श्रॉफने हिरोपंती चित्रपटाच्या पहिल्या सत्राचे शुटिंग पूर्ण केले आहे. साजिद नाडियादवाला निर्मित ‘हिरोपंती २’ चे शुटिंग २ एप्रिलपासून मुंबईत सुरू झाले होते. हा चित्रपटसुद्धा अॅक्शनने भरपूर असणार आहे. याचे अॅक्शन-डिझाईनिंग अहमद खान यांनी केले आहे. बागी २ आणि बागी ३ नंतर हिरोपंती २ हा टायगर श्रॉफ आणि अहमद खानचा एकत्र तिसरा चित्रपट आहे.

Poster of 'Hiropanti 2'
‘हिरोपंती २’चे पोस्टर

साजिद नाडियाडवाला यांनी अकादमी पुरस्कारप्राप्त संगीतकार ए.आर. रहमान यांना ‘हिरोपंती २’ च्या संगीत नियोजनाची जबाबदारी सोपवलीय. तसेच प्रख्यात गीतकार मेहबूब यांनाही चित्रपटासाठी साइन केलंय. ते एकंदरीत ५ गाणी बनविणार आहेत. योगायोग म्हणजे अहमद खान, मेहबूब आणि ए.आर. रहमान ‘रंगीला’ मध्ये एकत्र आले होते आणि आता तब्बल २५ वर्षांनंतर हे ‘त्रिकुट’ पुन्हा ‘हिरोपंती २’ साठी एकत्र येतंय.

‘हिरोपंती २’ ची घोषणा गेल्या फेब्रुवारीमध्ये करण्यात आली होती आणि यावर्षी टायगर श्रॉफच्या वाढदिवशी २ मार्चला या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषीत करण्यात आली होती. ३ डिसेंबर २०२१ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. परंतु सध्या वाढत असलेल्या कोरोना केसेस यामुळे हा चित्रपट वेळेत पूर्ण होईल का याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहे.

हेही वाचा - कोरोनामुळे ‘सूर्यवंशी’चे प्रदर्शन पुन्हा एकदा लांबणीवर!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.