मुंबई - बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार लवकरच 'मिशन मंगल' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. अशात अक्षयच्या आणखी एका चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
'बच्चन पांडे' असं शीर्षक असणाऱ्या या चित्रपटातील अक्षयचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. अक्षयचा हा वेगळा लूक चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारा आहे. यात तो बच्चन पांडे नावाचं पात्र साकारणार असून फरहाद सामजी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.
-
Coming on Christmas 2020!
— Akshay Kumar (@akshaykumar) July 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
In & As #BachchanPandey 😎
In #SajidNadiadwala’s Next, directed by @farhad_samji @NGEMovies @WardaNadiadwala pic.twitter.com/ayMkzwPEsJ
">Coming on Christmas 2020!
— Akshay Kumar (@akshaykumar) July 26, 2019
In & As #BachchanPandey 😎
In #SajidNadiadwala’s Next, directed by @farhad_samji @NGEMovies @WardaNadiadwala pic.twitter.com/ayMkzwPEsJComing on Christmas 2020!
— Akshay Kumar (@akshaykumar) July 26, 2019
In & As #BachchanPandey 😎
In #SajidNadiadwala’s Next, directed by @farhad_samji @NGEMovies @WardaNadiadwala pic.twitter.com/ayMkzwPEsJ
सिनेमाच्या फर्स्ट लूक पोस्टसोबतच याची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. २०२० मध्ये ख्रिस्मसला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. साजिद नाडियाडवाला या सिनेमाची निर्मिती करणार आहे. अक्षय कुमारनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून चित्रपटाचं पोस्टर शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.