मुंबई : टायगर श्रॉफने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा ५ नोव्हेंबरला केली होती. यावेळी ''गणपथ' या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला होता. या टीझरमध्ये टायगर श्रॉफची स्टाईल त्याच्या चाहत्यांना आवडली होती. आता या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
-
TIGER SHROFF - #GANAPATH FIRST LOOK... First look poster of action-thriller #Ganapath... Stars #TigerShroff... Directed by #VikasBahl... Produced by #VashuBhagnani, #VikasBahl, #DeepshikhaDeshmukh and #JackkyBhagnani... Shoot begins mid-2021... 2022 release. #GanapathFirstLook pic.twitter.com/eX0Qd65HoZ
— taran adarsh (@taran_adarsh) November 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">TIGER SHROFF - #GANAPATH FIRST LOOK... First look poster of action-thriller #Ganapath... Stars #TigerShroff... Directed by #VikasBahl... Produced by #VashuBhagnani, #VikasBahl, #DeepshikhaDeshmukh and #JackkyBhagnani... Shoot begins mid-2021... 2022 release. #GanapathFirstLook pic.twitter.com/eX0Qd65HoZ
— taran adarsh (@taran_adarsh) November 10, 2020TIGER SHROFF - #GANAPATH FIRST LOOK... First look poster of action-thriller #Ganapath... Stars #TigerShroff... Directed by #VikasBahl... Produced by #VashuBhagnani, #VikasBahl, #DeepshikhaDeshmukh and #JackkyBhagnani... Shoot begins mid-2021... 2022 release. #GanapathFirstLook pic.twitter.com/eX0Qd65HoZ
— taran adarsh (@taran_adarsh) November 10, 2020
विकास बहल यांनी 'गणपथ' दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची निर्मिती वशु भगनानी, विकास बहल, दीपशिखा देशमुख आणि जॅकी भगनानी करत आहेत. २०२१मध्ये ''गणपथ'चे शूटिंग सुरू होईल आणि २०२२पर्यंत प्रदर्शित होईल.
हेही वाचा -शाहिद कपूरने घेतला मॉर्निंग राइडचा आनंद
फिल्म ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी 'गणपथ' या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. टायगर श्रॉफची नायिका कोण राहील, याचा अद्याप खुलासा झालेला नाही. या चित्रपटात भरपूर अॅक्शन चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा - जखमी असतानाही कसरत करणाऱ्या टायगर श्रॉफचा व्हिडिओ व्हायरल
टायगर श्रॉफच्या 'बागी 4' या चित्रपटाचीही घोषणा झाली आहे. 'बागी 4'चे शूटिंग डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अहमद खान यांनी नुकतीच याबाबत माहिती दिली. इतकेच नाही तर टायगर श्रॉफच्या 'हीरोपंती 2'चे शूटिंगही लवकरच सुरू होणार आहे. टायगर श्रॉफच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलताना आपल्याला बर्याच अॅक्शन्स पाहायला मिळतील.