मुंबई - पॅन-इंडिया स्टार प्रभास आपला वाढदिवस २३ ऑक्टोबरला साजरा करणार असला तरी आतापासून राधेश्याम चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रभासचे कॅरेक्टर पोस्टर चाहत्यांसाठी प्रसिद्ध केले आहे. या चित्रपटात प्रभास 'विक्रमादित्य' ची भूमिका साकारत आहे. त्याचा लूक पाहून इतका अंदाज तर नक्कीच येतो की तो यात मोठा धमाका करणार आहे.
यापूर्वी पूजा हेगडेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचा पहिला लूक प्रसिद्ध केला होता. चाहत्यांनी प्रभासच्या वाढदिवसाची तयारी सुरू केलेली असताना त्याचा हा लूक त्यांना आनंद देणारा आहे.
-
Aaaaat Darling 💘
— Prabhas (@PrabhasRaju) October 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Introducing #Prabhas as #Vikramaditya from #RadheShyam 😍 #RadheShyamSurprise #HappyBirthdayPrabhas @hegdepooja @director_radhaa @UVKrishnamRaju @UV_Creations @TSeries #BhushanKumar #Vamshi #Pramod @PraseedhaU @AAFilmsIndia @GopiKrishnaMvs pic.twitter.com/1YcRBtPlSy
">Aaaaat Darling 💘
— Prabhas (@PrabhasRaju) October 21, 2020
Introducing #Prabhas as #Vikramaditya from #RadheShyam 😍 #RadheShyamSurprise #HappyBirthdayPrabhas @hegdepooja @director_radhaa @UVKrishnamRaju @UV_Creations @TSeries #BhushanKumar #Vamshi #Pramod @PraseedhaU @AAFilmsIndia @GopiKrishnaMvs pic.twitter.com/1YcRBtPlSyAaaaat Darling 💘
— Prabhas (@PrabhasRaju) October 21, 2020
Introducing #Prabhas as #Vikramaditya from #RadheShyam 😍 #RadheShyamSurprise #HappyBirthdayPrabhas @hegdepooja @director_radhaa @UVKrishnamRaju @UV_Creations @TSeries #BhushanKumar #Vamshi #Pramod @PraseedhaU @AAFilmsIndia @GopiKrishnaMvs pic.twitter.com/1YcRBtPlSy
मॅग्नम ओपस 'राधेश्याम' ही युरोपमधील एक महाकाव्य प्रेमकथा असल्याचे मानले जाते. या चित्रपटात पॅन इंडिया स्टार प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटामध्ये सचिन खेडेकर, भाग्यश्री, प्रियदर्शी, मुरली शर्मा, साशा छेत्री, कुणाल रॉय कपूर यांच्यासह अनेक कलाकारांच्या भूमिका असणार असून हा चित्रपट हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.
राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित हा चित्रपट बहुभाषिक रोमँटिक पीरियड-ड्रामा आहे. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे.
या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे.