मुंबई - अभिनेता कार्तिक आर्यन लवकरच 'पती पत्नी और वो' चित्रपटात झळकणार आहे. दिग्दर्शक लव्ह रंजनच्या 'प्यार का पंचनामा' चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अल्पावधीतच तो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. अशात प्रेक्षक त्याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतानाच कार्तिकने चित्रपटातील आपला फर्स्ट लूक शेअर केला आहे.
एखादं पात्र मागे सोडणं आणि एका नव्या पात्रात रूपांतरीत होणं, हे त्रासदायक आहे. मात्र, मजेशीर प्रक्रिया आहे. एक अभिनेता झाल्यानंतर तुम्हाला एकाच जीवनात खूप सारी पात्र जगता येतात, असं म्हणत कार्तिकने चित्रपटातील आपला फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
मुदस्सर अजीजचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट १९७८ मध्ये आलेल्या संजीव कुमार यांच्या 'पती पत्नी और वो' चित्रपटाचा रिमेक असणार आहे. या चित्रपटात कार्तिकशिवाय अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. यात भूमी कार्तिकच्या पत्नीची तर अनन्या सेक्रेटरीची भूमिका साकारणार आहे. दरम्यान या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हे कलाकार काही दिवसांपूर्वीच लखौनाला गेले आहेत.