मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आपल्या काही चित्रपटांतून बॉलिवूडनं केलेली अभिनेत्रीची व्याख्या बदलण्याचा प्रयत्न करत आहे. अकिरा, इत्तेफाक आणि नुकताच आलेला 'खानदानी शफाखाना' याचंच उदाहरण आहे. मात्र, सोनाक्षीच्या या प्रयोगाला प्रेक्षकांची मनं जिंकण्यात आणि बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवण्यात अपयश येत असल्याचं दिसत आहे.
शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या सोनाक्षीच्या खानदानी शफाखाना चित्रपटालाही प्रेक्षकांचा तितकासा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमाने पहिल्या दिवशी तब्बल १ कोटींची कमाई केली आहे. ही कमाई पाहता दबंगची रज्जो चाहत्यांची मनं जिंकण्यात अपयशी ठरली आहे, असं म्हणणं ववागं ठरणार नाही.
शिल्पी दासगुप्तानं या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात सोनाक्षीशिवाय वरूण शर्मा आणि बादशाह यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. आता शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचा फायदा चित्रपटाच्या कलेक्शनला होतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.