मुंबई: बॉलिवूडची पूर्वाश्रमीची अभिनेत्री ममता कुलकर्णी हिच्या खळबळजनक आयुष्यावर आधारित बॉलिवूडमध्ये चित्रपट बनणार आहे. तिच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘द स्टारडस्ट अफेअर’ या पुस्तकाचा यासाठी आधार घेण्यात येईल. या पुस्तकाचे सिनेमा बनवण्यासाठीचे हक्क निर्माता निखिल द्विवेदी यांनी घेतले आहेत.
"निखिलने बिलाल सिद्दीकी यांच्या" द स्टारडस्ट अफेअर "या पुस्तकाचे हक्क मिळवले आहेत. ममता कुलकर्णीच्या अशांत आणि घटनात्मक जीवनावर आधारित हे पुस्तक आहे. तिचे जीवन आणि प्रवास अनेक खळबळी माजवणारा आहे, अगदी बॉलिवूड स्टार होण्यापासून ते अंडरवर्ल्ड कथित 'गॉडमदर' होण्यापर्यंत ममता कुलकर्णी नेहमीच चर्चेत राहिली आहेत." हे पुस्तक निखिलच्या पुढच्या निर्मितीसाठी आधार देईल आणि सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यावर निर्माता अधिकृत घोषणा जाहीर करतील, असे एका सूत्रांनी सांगितले.
नव्वदच्या दशकात पडद्यावर बिनधास्त वावरणाऱ्या ममताने करण अर्जुन, बाझी आणि चायना गेट सारख्या हिट चित्रपटात काम केले होते.
हेही वाचा - श्रध्दा कपूरचे इन्स्टाग्रामवर ५० दशलत्क्ष फॉलोअर्स, स्वहस्ताक्षरात मराठीतून मानले चाहत्यांचे आभार
बॉलिवूडमधून नामशेष झाल्यानंतर अभिनेत्री ममता केनियाच्या नैरोबी येथे स्थायिक झाल्याचे सांगितले जाते. ती सध्या आध्यात्मिक जीवन जगत असल्याचेही बोलले जात असले तरी अनेक वेळा अंमली पदार्थांच्या रॅकेट संदर्भात तिच्या नावाची चर्चा झडत असते.
“सर्व प्रकारचे लॉकडाऊन बंद झाल्यानंतर चित्रपटाच्या पटकथेवरील काम लवकरच सुरू होईल आणि एकदा शूट सुरू झाल्यावर टीम या चित्रपटासाठी मुख्य भूमिका करणाऱ्या नायिकेची निवड करेल," असे सूत्राने सांगितले.