ETV Bharat / sitara

मिथून चक्रवर्ती यांची प्रकृती स्थिर, शूटिंगदरम्यान वाटत होते अस्वस्थ

author img

By

Published : Dec 20, 2020, 12:53 PM IST

मिथून चक्रवर्ती यांना उलट्या आणि अतिसाराचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर मसुरी उप-रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या पथकाने ते सव्हॉय हॉटेलमध्ये असताना त्यांची तपासणी केली. सध्या डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.

mithun
mithun

मसुरी - बॉलिवूडचे 'डिस्को डान्सर' मिथून चक्रवर्ती यांची तब्येत अचानक येथे आले असता खालावली. त्यांना उलट्या आणि अतिसाराचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर मसुरी उप-रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या पथकाने ते सव्हॉय हॉटेलमध्ये असताना त्यांची तपासणी केली. सध्या डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.

'द काश्मीर फाइल्स'चे शूटिंग

मिथून चक्रवर्ती मसुरी येथे एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी आले आहेत. 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाच्या शूटिंगच्या संदर्भात मिथून चक्रवर्ती, अनुपम खेर यांच्यासह अनेक कलाकार मसुरीमध्ये आहेत. शनिवारी रात्री उशिरा मिथून यांची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगच्या ठिकाणी ते पोहोचू शकले नाहीत.

विश्रांती घेण्याचा सल्ला

ज्या हॉटेलमध्ये ते थांबले आहेत, तेथेच डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. औषध दिल्याने त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या काही भागांचे चित्रीकरण मसुरीमध्ये होत आहे. मसुरीसह डेहराडून, हृषिकेशसह विविध भागातही हे शूटिंग होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.