मुंबई - आशिकी गर्ल श्रद्धा कपूर आणि सुशांत सिंग राजपूतचा छिछोरे चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा विनोदी आणि मैत्रीची झलक असणारा ट्रेलर प्रदर्शित झाला. ज्यानंतर आता सिनेमातील पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.
पगले फिकर नॉट, असं शीर्षक असलेल्या या गाण्यात श्रद्धा आणि सुशांतच्या डान्सची झलक पाहायला मिळत आहे. आयुष्य प्रत्येक क्षणी कोणतीही चिंता न करता जगावं, हे सांगणार फिकर नॉट गाणं तरुणांची मनं नक्कीच जिंकेल. या गाण्याला नकाश अझीझ, देव नेगी, अमित मिश्रा, अमिताभ भट्टाचार्य, श्रीरामचंद्र आणि अंतरा मित्रा यांनी आवाज दिला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
इंजिनिअरींगच्या कॉलेजमधील ग्रुप फ्रेंडशिपवर आधारित हा सिनेमा ६ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सुशांतनं अनी तर श्रद्धानं माया नावाचं पात्र साकारलं आहे. चित्रपटात श्रद्धा आणि सुशांतशिवाय वरूण शर्मा, प्रतिक बब्बर, ताहिर राज भसीन, तुषार पांडे, सहर्ष शुक्ला आणि नवीन पोलीशेट्टी यांच्याही महत्तावाच्या भूमिका आहेत. नितेश तिवारी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.