मुंबई: रॅपर बादशाहच्या गाण्याला लाखो-करोडो लोक फॉलो करतात. मात्र, यातील अनेक फॉलोअर्स फेक असल्याचे मुंबई पोलिसांच्या गुन्हा शाखेला वाटते. याची चौकशी करण्यासाठी त्याला ७ ऑगस्ट रोजी बोलवण्यात आले होते. ६ तारखेला त्याला समन्स मिळाले होते. माहितीनुसार, गुन्हे शाखेने बादशाहसाठी २88 प्रश्नांची यादी तयार केली आहे.
-
Mumbai: Rapper Badshah arrives at Crime Branch for questioning in fake followers racket case. https://t.co/UFZDDgTv1n pic.twitter.com/lYMka18DBf
— ANI (@ANI) August 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Mumbai: Rapper Badshah arrives at Crime Branch for questioning in fake followers racket case. https://t.co/UFZDDgTv1n pic.twitter.com/lYMka18DBf
— ANI (@ANI) August 7, 2020Mumbai: Rapper Badshah arrives at Crime Branch for questioning in fake followers racket case. https://t.co/UFZDDgTv1n pic.twitter.com/lYMka18DBf
— ANI (@ANI) August 7, 2020
तो गुरुवारीही तपास अधिकाऱ्यांसमोर हजर झाला. आतापर्यंत एकूण 20 जणांना गुन्हे शाखेने प्रश्न विचारले आहेत. रॅपर बादशाहने यावेळी बॅगी ब्लू शर्ट आणि ब्लॅक लोअर घालून आला होता. कोरोना व्हायरसच्या भीतीने त्याने त्याच्या चेहऱ्यावर मास्क लावला होता.
बादशाहकडून गुन्हे शाखेला हे समजून घ्यायचे आहे की, सोशल मीडियावर त्याच्या गाण्याला कोट्यवधी लोकांच्या लाईक मिलाल्या आहेत. परंतु इतकी मोठी संख्या असताना केवळ शेकडो लोकांनीच त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. उदाहरणार्थ, त्याच्या पागल है या गाण्याला एका दिवसा ७५ दशलक्ष व्यूव्ह्ज मिळाले, मात्र गुगलने हा दावा फेटाळून लावला आहे. बादशाहने केलेल्या या दाव्याची पडताळणी गुन्हे शाखेला करायची आहे.
हेही वाचा - अभिनेता समीर शर्माने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय, सोनाक्षीने वाहिली श्रद्धांजली
गुन्हे शाखेने बादशाहकडून फॉलोअर्सची यादी मागविली आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणातील फिर्यादी कोयना मित्रा यांचा जवाब नोंदवला आहे. एकूणच आतापर्यंत गुन्हे शाखेने या प्रकरणात 20 जणांची चौकशी केली आहे.
बनावट फॉलोअर्स प्रकरणावर कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी यापूर्वी मुंबई पोलिसांना दिले आहेत.गायक भूमि त्रिवेदी यांनी तिच्या नावाचे बनावट प्रोफाइल असल्याबद्दल तक्रार केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला होता. आरोपीला अटक करण्यात आली असता, तपासणी दरम्यान पोलिसांना घोटाळ्याची व्याप्ती समजली आणि त्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.
प्रभाव टाकणाऱ्यांचा दर कसा वाढला आहे आणि हे दर कसे ठरवले जातात याविषयीही पोलिस उत्सुक आहेत. यापूर्वी अनेक बनावट सोशल मीडिया फॉलोअर्स घोटाळ्याप्रकरणी प्रियंका चोप्रा जोनास आणि दीपिका पादुकोण यांनाही पोलिसांनी विचारपूस केली असल्याची माहिती समोर आली होती. तथापि, त्या संदर्भात कोणतीही प्रगती झालेली नाही.