ETV Bharat / sitara

Jhund Teaser : उत्सुकता शिगेला पोहोचवणारा 'झुंड'चा टीझर रिलीज - महानायक अमिताभ बच्चन

'झुंड' या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात अजय अतुलच्या संगीताने होते. झोपडपट्टीतील मुले एकत्र येऊन हाताला जे सापडेल त्याचा आवाज काढत ताल धरलेली दिसतात. याच ठेक्यावर चित्रपटाची स्टार कास्ट, निर्माते, क्रू मेंबर्स आणि दिग्दर्शकाचे नावही पडद्यावर झळकते. या पहिल्या टिझरमध्ये केवळ अमिताब बच्चन यांची एन्ट्री दिसते.

'झुंड'चा टीझर रिलीज
'झुंड'चा टीझर रिलीज
author img

By

Published : Feb 8, 2022, 12:14 PM IST

मुंबई - मराठी सिनेसृष्टीचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'झुंड' चित्रपटाची बऱ्याच दिवसापासून प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. यामध्ये महानायक अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा 'झुंड'चा टीझर रिलीज झाला आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात अजय अतुलच्या संगीताने होते. झोपडपट्टीतील मुले एकत्र येऊन हाताला जे सापडेल त्याचा आवाज काढत ताल धरलेली दिसतात. याच ठेक्यावर चित्रपटाची स्टार कास्ट, निर्माते, क्रू मेंबर्स आणि दिग्दर्शकाचे नावही पडद्यावर झळकते. या पहिल्या टीझरमध्ये केवळ अमिताब बच्चन यांची एन्ट्री दिसते. इतर कलाकारांना अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

नागराज मंजुळे यांचा 'झुंड' चित्रपट हा फुटबॉलपटू विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. अमिताभ बच्चन त्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटासाठी त्यांनी नागपूर येथे शूटिंग पूर्ण केले.चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन हे एकत्र आल्यामुळे आता या चित्रपटाची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बडी 'फिल्म बडे पडदे पे' असे कॅप्शन या टीझरला देण्यात आले आहे.

भूषण कुमार, क्रिश्न कुमार, ताडव फिल्म एंटरटेन्मेंट आणि आटपाट यांच्याअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ४ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - दीपिका आणि प्रभास 'के' चित्रपटाच्या शुटिंगसाठी सज्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.