मुंबई - दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झालीयत. या सिनेमाचा दबदबा अजूनही आहे. या चित्रपटाचे अभिनेता आमीर खानने कौतुक केलंय. त्याने आपल्या फोसबुक पोस्टमध्ये लिहिलंय की, डीडीएलजे हा चित्रपट अजूनही जगभरात चमकत आहे.
- https://www.facebook.com/aamirkhan.com/posts/10157952707367799
आमीर म्हणाला, "एक हीरो जो आपला विवेक शोधतो, एक हीरॉईन जी आपला आवाज शोधते, एक खलनायक ज्याचे हृदय बदलून जाते. डीडीएलजी आपल्याला सह्रदयपणा, चांगुलपणा आणि उंची दाखवते."