मुंबई - महामारी हा शब्द केवळ इतिहासाच्या पानांमध्ये दिसला, अशी जुनी आठवण अभिनेत्री प्रिती झिंटाने सांगितली आहे. प्रितीने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आपल्या पतीच्या गालाचे चुंबन घेताना दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, ''महामारी इतिहासातील पुस्तकांमध्ये होती, तेव्हाचे बिनधास्त दिवस आठवतात. आपले आयुष्य सुरक्षित आणि आरोग्यदायी अगदी पक्ष्यांसारखे मुक्त होते, ते दिवस परत आणा.''
प्रितीने २० वेळा केलीय कोरोना टेस्ट
या अभिनेत्रीने अलीकडेच एक पोस्ट लिहून सांगितले होते की, ती आता कोरोनाची क्वीन झाली आहे. आयपीएलमध्ये 'किंग्ज इलेव्हन पंजाब'ला पाठिंबा देण्यासाठी अभिनेत्री प्रिती सध्या यूएईमध्ये आहे. प्रितीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती कोरोना टेस्ट करताना दिसत आहे. प्रितीने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''मी कोरोना टेस्ट क्वीन बनले आहे. ही माझी २० वी कोरोना टेस्ट आहे.''
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अभिनेत्रीने व्हिडीओ कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "प्रत्येकजण मला विचारतो की आयपीएलच्या टीम बायो बबलमध्ये राहणे कसे असते. तर सांगते हे ६ दिवसांच्या क्वारंटाइनने सुरू होते. कोविड टेस्ट दर ३ ते ४ दिवसांनी आणि बाहेर पडायचे नाही. फक्त आमची खोली, किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी ठरलेले रेस्टॉरंट, जिम आणि कारमधून स्टेडियम. ड्रायव्हर्स, शेफ सर्वजण बायो बबलमध्ये राहतात. म्हणून बाहेरून अन्न नाही, लोकांशी कोणताही संवाद नाही. तुम्ही माझ्यासारखी फ्री बर्ड असाल तर हे खूप कठीण आहे; परंतु हे २०२० आहे. कोरोना साथीच्या काळात आयपीएलचे आयोजन झाले यातच खूश राहिले पाहिजे.''