मुंबई - शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूतने आपली मुलगी मीशाचे केस रंगवलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यामुळे तिला बऱ्याचजणांनी ट्रोल केले. प्रत्येक गोष्टीला गंभीर घेण्याची गरज नसल्याचे मीराचे म्हणणे आहे. मीरा म्हणाली, "तो रंग नव्हता. तो नियमित पेंट होता. मला वाटते मुलांना स्वातंत्र्य दिले पाहिजे, त्यांना चांगला वेळ घालवू दिला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला गंभीरपणे घेतले नाही पाहिजे."
दोन आठवड्यापूर्वी मीराने एक फोटो पोस्ट केला होता. यात तिची दोन वर्षाची मुलगी मीशाचे केस लाल होते. या फोटोला तिने कॅप्शन दिले होते, "मी रेग्यूलर मॉम नाही. कुल मॉम आहे." परंतु या फोटोवर युजर्सनी टीका सुरू केली आणि मीराला ट्रोल करायला सुरूवात केली. ट्रोल झाल्यानंतर मीराने दुसरा फोटो शेअर करीत लिहिले, "रिलॅक्स, हे टेम्पररी आहे. पाच वर्ष होईपर्यंत वाट पाहा."