मुंबई - 'जज मेंटल है क्या' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अभिनेत्री कंगना रानावत पत्रकारांवर भडकली होती. यामुळे पत्रकार नाराज झाले होते. दुखावल्या गेलेल्या सर्व पत्रकारांची माफी एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्सच्या वतीने मागण्यात आली आहे.
'जजमेंटल है क्या'च्या म्यूझिक लॉन्चमध्ये ७ जुलैला कलाकार आणि पत्रकार यांच्यात जे घडले त्यामुळे दुर्दैवाने वेगळे वळण लागले. तिथे आलेले लोक सन्मानाने जमले होते, मात्र जे घडले ते आमच्या सिनेमाच्यावेळी घडले. त्यामुळे एक निर्माता म्हणून मी आपल्या सर्वांची माफी मागत आहे आणि झाल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करीत असल्याचे निवेदन सोशल मीडियावरून प्रसिध्द करण्यात आलंय.
जजमेंटल है क्या हा चित्रपट २६ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया येऊ नये यासाठी एकता कपूरने उचललेले आहे.
-
#JudgeMentallHaiKya pic.twitter.com/vE7pN5pKhH
— BalajiMotionPictures (@balajimotionpic) July 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#JudgeMentallHaiKya pic.twitter.com/vE7pN5pKhH
— BalajiMotionPictures (@balajimotionpic) July 10, 2019#JudgeMentallHaiKya pic.twitter.com/vE7pN5pKhH
— BalajiMotionPictures (@balajimotionpic) July 10, 2019
पत्रकारांवरच भडकली होती कंगना
कंगनाच्या जजमेंटल हैं क्या चित्रपटाचं साँग लॉन्च इवेंट ७ जुलैला पार पडलं. याच इव्हेंटदरम्यान कंगना पत्रकारासोबत वाद घालायला लागली. कंगनाचं दिग्दर्शनीय पदार्पण असणाऱ्या मणिकर्णिका चित्रपटाबद्दल चुकीच्या गोष्टी लिहिल्यानं कंगनाने पत्रकाराला चांगलंच सुनावलं.
कंगना म्हणाली, 'तू माझ्या चित्रपटाबद्दल वाईट लिहिलं. तू एवढ्या खालच्या स्तराचा विचार कसा करू शकतो. मी हा चित्रपट करून काही चूक केली का? तू मला कट्टर देशभक्त म्हणालास, एका महिलेने देशप्रेमावर आधारित चित्रपट बनवला तर काय चुकीचं काम केलं?' तिच्या या प्रश्नावर उत्तर देत पत्रकाराने म्हटलं, 'मी मणिकर्णिकाबद्दल एकही ट्विट केलं नाही. तू भलेही सध्या मोठ्या पदावर आहेस, मात्र तू कोणा पत्रकाराला धमकी देऊ शकत नाही.'
हा वाद इथेच थांबला नाही, कंगनाने म्हटलं की, 'हा पत्रकार मणिकर्णिकाच्या चित्रीकरणावेळी माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आला होता. तीन तास तो तिथेच होता. यानंतर त्याने मला मेसेजही केले होते. मात्र, नंतर अचानकच त्याने माझ्या चित्रपटाबद्दल नकारात्मक गोष्टी लिहिण्यास सुरूवात केली.' पत्रकाराने हे आरोपदेखील फेटाळले आणि आपण कंगनाला कोणतेही मेसेज केले नसल्याचे म्हटले.