मुंबई - पंजाबी स्टार दिलजित दोसंझला नुकत्याच रिलीज झालेल्या 'सूरज पे मंगल भारी' या चित्रपटासाठी मराठी शिकावे लागले. नवीन भाषा शिकणे सोपे नसल्याचे त्याने कबूल केले आहे. या चित्रपटात त्याची मध्यवर्ती भूमिका असून व्यक्तिरेखेची गरज म्हणून त्याला मराठी बोलता येणे आवश्यक होते.
याबद्दल दिलजीत म्हणाला, "प्रेमासाठी माणसाला काय काय करावे लागते? मी साकारत असलेल्या व्यक्तिरेखेला प्रेयसीसाठी मराठी शिकावे लागले आणि मला सिनेमावर असलेल्या प्रेमापोटी मला ते करावे लागले. माझे पात्र सिनेमात अनेकवेळा मराठी बोलते. तो मुंबईचा एक मुलगा आहे, त्यामुळे त्याच्या बोलचालीचा हा एक भाग आहे."
हेही वाचा - 'बजरंगी भाईजान'मधील 'मुन्नी'ने सर्वांना केले चकित, आता अशी दिसतेय हर्षाली मल्होत्रा
तो म्हणाला, "नवीन भाषा निवडणे नेहमीच अवघड असते, परंतु या चित्रपटात त्याची आवश्यकता होती. हे मला प्रामाणिक वाटले. म्हणून जेव्हा माझे पात्र फातिमाच्या व्यक्तिरेखेला आकर्षित करायचे होते, तेव्हा त्याने मराठी वाक्यांचा वापर केला. ती दृष्ये ह्रदयस्पर्शी आहेत. व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करण्यासाठी केलेली मेहनत जेव्हा रंग भरते तेव्हा पाहून खूप आनंद होतो.''
हेही वाचा - मी पुन्हा येईन, पुन्हा गाईन : अमृता फडणवीसांचा नवा निर्धार
अभिषेक शर्मा दिग्दर्शित हा विनोदी चित्रपट १५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. लॉकडाऊनमुळे दीर्घ प्रतीक्षेनंतर थिएटरमध्ये झळकलेला हा पहिलाच चित्रपट आहे. या काळात थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांचे दिलजीतने आभार मानले आहेत.