मुंबई - पंजाबी अभिनेता दिलजीत दोसांझ आणि क्रिती सेनॉनची जोडी लवकरच 'अर्जुन पटियाला' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात दिलजीत पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर क्रिती मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकणार आहे.
काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. यानंतर चित्रपटातील गाणीही प्रदर्शित करण्यात आली असून आता यातील दिल तोडेया हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. क्रितीच्या एका इमोशनल डायलॉगपासून या गाण्याची सुरूवात होते. एकमेकांपासून दूर गेल्यावर क्रिती आणि दिलजीतची होणारी घालमेल यात पाहायला मिळते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
या गाण्याला दिलजीतनं स्वतः आवाज दिला आहे. तर गुरू रंधवाने गाण्याचे बोल लिहिले आहेत. दरम्यान या सिनेमात क्रिती आणि दिलजीतशिवाय वरूण शर्मा, सिमा पहवा, मोहम्मद अय्यूब आणि रोनीत रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. मोहित जुगराज यांचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा २६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.