ETV Bharat / sitara

धर्मेद्र यांनी शेअर केला मोराचा व्हिडिओ, चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - धर्मेंद्र देओल

धर्मेंद्र यांनी त्यांच्या फार्म हाऊसवर आलेल्या एका मोराचा व्हिडिओ शेअर केला आहे. नेहमी प्रमाणे हा व्हिडिओ चाहत्यांना आवडला असून भरपूर प्रतिक्रिया त्यांना मिळत आहेत.

Dharmendra shared a video of the peacock
धर्मेद्र यांनी शेअर केला मोराचा व्हिडिओ
author img

By

Published : Nov 6, 2020, 8:05 PM IST

मुंबई - धर्मेंद्र पंजाबमधील आपल्या फार्म हाऊसवर चित्रपट आणि चित्रपटसृष्टीपासून दूर वेळ घालवत आहेत. सोशल मीडियावर ते खूप सक्रिय असतात. अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ते चाहत्यांना खूश करीत असतात. आपल्या शेतातील पीक, नवी वनस्पती, फळे यांचे फोटो आणि व्हिडिओ ते चाहत्यांना दाखवत असतात. आता धर्मेंद्र यांनी आपल्या फार्म हाऊसवर आलेल्या एका मोराचा व्हिडिओ शेअर केला आहे.

  • Chal, Dharam ke farm pe chalte hain.... apne haath se choga khilata hai ....morni , apne mor 🦚 ko bhi saath le aye ....love 💕 begets love 💕 pic.twitter.com/VxTpvPxUnF

    — Dharmendra Deol (@aapkadharam) November 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते मोराला धान्य देत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी त्यांच्या व्हिडिओला मजेशीर कॅप्शन दिली आहे. नेहमी प्रमाणे हा व्हिडिओ चाहत्यांना आवडला असून भरपूर प्रतिक्रिया त्यांना मिळत आहेत.

धर्मेंद्र सध्या शूटिंगच्या दगदगीपासून दूर आहेत. त्यांनी एक प्रदीर्घ कारकीर्द भारतीय सिनेमासाठी समर्पित केली होती. धर्मेंद्र सध्या शूटिंगच्या दगदगीपासून दूर आहेत. त्यांनी एक प्रदीर्घ कारकीर्द भारतीय सिनेमासाठी समर्पित केली होती. धर्मेंद्र यांनी १९६०मध्ये अर्जुन हिंगोरानी यांच्या 'दिल भी तेरा हम भी तेरे' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. १९७०च्या दशकाच्या मध्यावर धर्मेंद्र जगातील सर्वात देखणा पुरुषांपैकी एक होते. धर्मेंद्र यांना वर्ल्ड आयर्न मॅन अवॉर्डही देण्यात आला आहे. धर्मेंद्रच्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये 'सत्यकाम', 'खामोशी', 'शोले', 'क्रोधी' आणि 'यादों की बरात' यांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.