ETV Bharat / sitara

B'day Spl: अशी सुरू झाली धनुष अन् रजनीकांतची मुलगी ऐश्वर्याची लव्हस्टोरी

१८ नोव्हेंबर २००४ साली धनुषने रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. धनुष ऐश्वर्याला पहिल्यांदा 'काढाल कोंडे'च्या स्क्रीनिंगदरम्यान भेटला.

धनुष -ऐश्वर्या
author img

By

Published : Jul 28, 2019, 8:24 AM IST

मुंबई - दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषनं बॉलिवूडमध्येही आपली छाप उमटवली. 'कोलावरी डी' गाण्यातून प्रचंड प्रसिद्धी मिळालेल्या धनुषचा आज ३६ वा वाढदिवस. त्याचं खरं नाव व्यंकटेश प्रभू असं आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया धनुषबद्दलच्या काही रंजक गोष्टी.

चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधी तो हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करत होता. मात्र, नंतर भाऊ आणि दिग्दर्शक सेलाघनच्या आग्रहानंतर त्याने अभिनयास सुरुवात केली. वडिलांच्याच 'थल्लुवढो लिमाई' चित्रपटातून त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तितका प्रतिसाद मिळाला नाही. धनुषने 'रांझना' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'कोलावरी डी' गाणं धनुषने केवळ सहा मिनीटात लिहिलं होतं. या गाण्याला यूट्यूबवर गोल्ड अॅवॉर्डने सन्मानित केलं गेलं. धनुष एक उत्तम अभिनेता, निर्माता, गायक आणि डान्सर आहे. त्याने आतापर्यंत अनेक तमिळ गाणे लिहिले आणि गायले आहेत.

अशी सुरू झाली लव्हस्टोरी -

१८ नोव्हेंबर २००४ साली धनुषने रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. धनुष ऐश्वर्याला पहिल्यांदा 'काढाल कोंडे'च्या स्क्रीनिंगदरम्यान भेटला. त्याच्या परफॉर्मन्सनं प्रभावित झालेल्या ऐश्वर्याने स्वतःच मैत्रीचा हात पुढे केला. ज्यानंतर दोघांतील जवळीकता वाढत गेली आणि यानंतर २ वर्षात ही जोडी विवाहबंधनात अडकली. ऐश्वर्या धनुषपेक्षा दोन वर्षाने मोठी आहे.

Intro:Body:

kiran

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.