मुंबई - कोरोना विषाणूचा प्रसार जगभरात वाऱ्यासारखा होत असून प्रत्येक देश आपल्यापरीने यावर उपाययोजना करत आहे. कोरोनाविषयी गैरसमज आणि अफवा पसरवू नये, यासाठी विविध क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींनी प्रबोधनासाठी पुढाकार घेतला आहे. सध्या #SafeHands Challenge हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेण्ड होत आहे. हे चॅलेंज स्वीकारुन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक मिनिटाच्या व्हिडिओत सचिन, कशा पद्धतीने स्वच्छ हात धुतले पाहिजे याचे प्रात्याक्षिक दाखवले आहे. त्याच्यानंतर आता अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही हे चॅलेंज स्वीकारत एक व्हिडिओ शेअर केला आहे.
-
Thank You @DrTedros, for nominating me for the #SafeHands Challenge!#COVID19 surely is an uphill health and public safety task, but all of us are in this fight together!I further nominate @rogerfederer,@Cristiano and @imVkohli to take up this challenge! #coronavirus #StaySafe https://t.co/45glSxXkqP pic.twitter.com/7s7R4pIrrL
— Deepika Padukone (@deepikapadukone) March 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Thank You @DrTedros, for nominating me for the #SafeHands Challenge!#COVID19 surely is an uphill health and public safety task, but all of us are in this fight together!I further nominate @rogerfederer,@Cristiano and @imVkohli to take up this challenge! #coronavirus #StaySafe https://t.co/45glSxXkqP pic.twitter.com/7s7R4pIrrL
— Deepika Padukone (@deepikapadukone) March 17, 2020Thank You @DrTedros, for nominating me for the #SafeHands Challenge!#COVID19 surely is an uphill health and public safety task, but all of us are in this fight together!I further nominate @rogerfederer,@Cristiano and @imVkohli to take up this challenge! #coronavirus #StaySafe https://t.co/45glSxXkqP pic.twitter.com/7s7R4pIrrL
— Deepika Padukone (@deepikapadukone) March 17, 2020
हेही वाचा -कोरोनामुळे जिम बंद ; जॅकलिन, कॅटरिनाने निवडला 'हा' पर्याय
दीपिकाने चेहऱ्यावर मास्क लावुन हात कसे धुवावे, याचे प्रात्यक्षिक या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. तसेच तिने हे चॅलेंज पूर्ण केल्यानंतर विराट कोहली, रॉजर फेडरर आणि क्रिस्तियाने रोनाल्डो यांना देखील टॅग करत हे चॅलेंज पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरात ६ हजाराहून अधिक लोकांचा जीव घेतला आहे. तर, भारतातही कोरोनाचे १३०हून अधिक रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे भारतात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत.
हेही वाचा -परदेशातून परतताच अनुप जलोटा यांना आयसोलेशनसाठी हलवले