ETV Bharat / sitara

'महाभारत' हा दीपिकासाठी सर्वात महत्त्वकांक्षी चित्रपट - 'महाभारत' हा दीपिकासाठी सर्वात 'महत्त्वकांक्षी' चित्रपट

दीपिका पदुकोण 'महाभारत' या आगामी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटची ती सहनिर्मातीही असेल. तिच्यासाठी हा खूप महत्त्वकांक्षी चित्रपट असल्याचे तिने सांगितले.

Deepika Padukon in Mahabharat
दीपिका पदुकोण 'महाभारत'
author img

By

Published : Feb 11, 2020, 5:00 PM IST

मुंबई - अभिनेत्री दीपिका पदुकोण 'महाभारत' या आगामी चित्रपटात द्रोपदीची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट द्रोपदीच्या दृष्टीकोनातून असेल. दीपिका सध्या पती रणवीर सिंगसोबत अज्ञात ठिकाणी सुट्टीचा आनंद घेत आहे. सुट्टीवर जाण्यापूर्वी तिने एका आघाडीच्या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केलाय.

पौराणिक पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटासाठी दीपिकाने निर्माता मधु मन्टेना यांच्याशी हातमिळवणी केली आहे. या चित्रपटाची ती सहनिर्माती असेल. द्रोपदीच्या दृष्टीकोनातून महाभारताची कथा पडद्यावर मांडण्यात येणार आहे.

दीपिका म्हणाली, ''महाभारत बनवणे इतर चित्रपटांसारखे नाही. निर्मितीच्या स्केलपासून ते बजेट, वेशभूषा यासाठी पाटपट वेळ द्यावा लागणार आहे. कमी वेळात हे पूर्ण करणे शक्य नाही. हा माझा महत्त्वकांक्षी चित्रपट आहे. यासाठी मी बराच विचार केला. मी छपाकच्या प्रमोशनमध्ये गुंतली होते. त्यामुळे यावर चर्चा करायला वेळ मिळाला नाही. आम्ही अद्याप कास्ट आणि क्रू यावर विचार केलेला नाही.''

कामाच्या पातळीवर दीपिकाचा अलिकडेच 'छपाक' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. रणवीर सिंग आगामी '८३' या चित्रपटात काम करीत आहे.

Intro:Body:

ent news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.