मुंबई - वक्त रूकता नहीं, बित जाता हैं और हम खर्च हो जाते हैं. इससे पहले, की मैं खर्च हो जाऊ, मैं अपना वक्त तेरे साथ बिताना चाहता हूँ... याप्रमाणेच आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, हे सांगणारे डायलॉग आजही प्रत्येकाच्या लक्षात आहेत. आयुष्य कसं जगावं याचं उत्तम उदाहरण असणारा 'ये जवानी हैं दिवानी' चित्रपट सहा वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला.
३१ मे रोजी या चित्रपटाला सहा वर्ष पूर्ण झाली. याच निमित्ताने दीपिकाने रणबीरसोबतचा आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. या चित्रपटातील प्रत्येक गाणं प्रेक्षकांची मनं जिंकणारं होतं. मात्र बलम पिचकारी या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता याच गाण्यावर डान्स करतानाचा आपला एक व्हिडिओ दीपिकाने शेअर केला आहे.
हा व्हिडिओ पाहून तुम्ही पुन्हा एकदा बनी आणि नैनाच्या प्रेमात पडाल, हे नक्की. दरम्यान दीपिका लवकरच छपाक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर रणबीरही ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. यात तो आलिया भट्टसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.