मुंबई - सुशांतच्या आत्महत्येने सर्वांना धक्का बसलाय. १४ जूनला त्याने पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही महिन्यापासून तो डिप्रेशनमध्ये होता. त्याने वेळेवर औषधेही घेतली नव्हती, असे सांगितले जात आहे. मात्र त्याच्या मृत्यूला वेगळा अँगल देण्याचा प्रयत्न केला जात आहे. बॉलिवूडमध्ये असलेल्या घराणेशाहीचा सुशांत शिकार ठरला अशी टीका काहीजण करीत आहेत.
नेपोटिझ्मच्या मुद्द्याने जोर पकडला आहे. सगळ्याबाजूने युजर्स विरोध करीत आहेत. तर काहीजण याला जबाबदार करण जोहरसह काही कलाकार असल्याचे सांगत आहेत. हा मुद्दा यापूर्वीही चर्चेत आला होता. मात्र आता एक मोहिम चालवण्याचा प्रयत्न केला जातोय. याचा फटका करण जोहर आणि आलियाच्या फॉलोअर्सच्या संख्येवर पडला आहे.
हेही वाचा - व्हिडिओ व्हायरल : सुशांतच्या हत्येला 'मुव्ही माफिया' जबाबदार, कंगनाचा आरोप
करण जोहरचे ११ मिलीयन फॉलोअर्स होते, आता त्याची संख्या घटली असून १०.८ मिलीयन इतकी झाली आहे. यासोबतच आलिया भट्टलाही १ लाख लोकांनी अनफॉलो केले आहे. हे सर्व सुशांतच्या मृत्यूनंतर घडले आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर व्हिडिओ शेअर करुन आरोप डागणाऱ्या कंगना रानावतच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली आहे. कंगनाच्याटीमचे इन्स्टाग्रामवर २ मिलीयन फॉलोअर्स होते. त्यांची संख्या आता ३.५ मिलीयन इतकी झाली आहे.
सुशांतसिंहचा मृतदेह १४ जून रोजी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आढळला होता. त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्यावर १५ जूनरोजी मुंबईत अंत्यसंस्कार पार पडले होते. काल त्याच्या अस्थींचे पाटण्यातील गंगा नदीमध्ये विसर्जन करण्यात आले.
हेही वाचा - सोनू निगमने दिला धोक्याचा इशारा : म्यूझिक इंडस्ट्रीतूनही येऊ शकते आत्महत्येची बातमी, पाहा व्हिडिओ