मुंबई - आज भारतीय संगीत विश्वातील अनमोल रत्न मोहम्मद रफी यांची चाळीसावी पुण्यतिथी आहे. रफी यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी सर्वसामान्य मुस्लीम कुटुंबात झाला होता. रफी यांच्यावर एका फकिराने गायलेल्या गाण्याचा मोठा प्रभाव पडला होता. त्या फकिराने गायलेली गाणी ते लक्षपूर्वक ऐकत असत. यातूनच त्यांच्यात संगीताची गोडी निर्माण झाली. 31 जुलै 1980 साली त्यांचा मृत्यू झाला. चाळीस वर्षांनंतरही त्यांच्या जादुई आवाजाने आजही श्रोत्यांचे कान तृप्त होत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या काही संस्मरणीय गाण्यांवर नजर टाकू..
विजय आनंदच्या काला बाजार चित्रपटातील खोया खोया चांद खुला आसमान, हे गाणे देव आनंद आणि वहिदा रेहमानवर चित्रीत करण्यात आले होते. 1960 मध्ये रिलीज झालेलं हे गाणं अजूनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतं.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
द ट्रेन चित्रपटातील गुलाबी आँखें जो तेरी देखी या सुपरहिट गाण्यासाठी मोहम्मद रफी यांचे कौतुक झाले होते.
1971 च्या 'हाथी मेरे साथी' या चित्रपटाचे हिट ट्रॅक 'नफरत की दुनिया को छोड के' आजही सर्वांच्या आवडीचे आहे. गाण्याचे विषाद सूर प्राणी आणि मानव यांच्यातील प्रेमाचे बंधन व्यक्त करतात.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
शम्मी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं बदन पे सितारे लपेटे हुये, हे गाणे आजही सर्वांच्या आवडीचे आहे.
शक्ती सामंताच्या 1970 साली रिलीज झालेल्या पगला कही का या चित्रपटातील तुम मुझे यूं भूला ना पाओगे, हे गाणे मोहम्मद रफिंच्या सदाबहार गाण्यांपैकी एक मानले जाते. हे गाणे शम्मी कपूर आणि आशा पारेख यांच्यावर चित्रित करण्यात आले होते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित झालेल्या काश्मीर की काली चित्रपटामधील ये चांद सा रोशन चेहरा गाणं रसिकांच्या मनावर अजून अधिराज्य करते.
अॅन इवीनिंग इन पॅरिस या चित्रपटातील अकेले अकेले कहा जा रहे हो, हे गाणे आजही रसिकांना आवडते. गाण्यातील रफी साहेबांच्या आवाजाने लाखो लोकांची मने जिंकली. त्यांच्या आवाजाशिवाय शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांच्या जबरदस्त अभिनयाने हे गाणे अधिक सजीव केले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
बैजू बावरा या चित्रपटाचे ओ दुनिया के रखवाले, हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. भारत भूषणवर चित्रित केलेले हे गाणे आजपर्यंत लोकप्रिय आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
सूरज चित्रपटातील बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, हे गाणे आजही सर्वोत्कृष्ट रोमँटिक ट्रॅकपैकी एक मानले जाते.
पत्थर के सनम चित्रपटाचे शीर्षक गीत हे एक परिपूर्ण गाणे आहे. ते सर्व दु:खी मनांना नि:संकोच प्रेमाने सांत्वन देते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
मोहम्मद रफी यांनी 700 हून अधिक चित्रपटांमध्ये अनेक भारतीय भाषांमध्ये 26,000 हून अधिक गाणी गायली आहेत. इंग्रजी आणि इतर युरोपियन भाषांमध्ये त्यांनी एकाहून अधिक ट्रॅकसाठी आवाज दिला. 1965 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार बहाल केला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
त्यांच्या निधनानंतर या महान गायकाचा सन्मान करण्यासाठी दोन दिवसांची राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">