मुंबई - 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' (डीडीएलजे) चित्रपटाला आज मंगळवारी २५ वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटातील रोमँटिक भूमिका करण्याबद्दल शाहरुख स्वतःवरच विश्वास नव्हता असे सांगून त्याने सर्वांना चकित केले आहे.
-
25 years ago on this day, the definition of romance was rewritten. Raj met Simran, they fell in love and since then, we can't stop swooning over this epic love story. Celebrating #DDLJ25 pic.twitter.com/ocpyDv0c5N
— Yash Raj Films (@yrf) October 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">25 years ago on this day, the definition of romance was rewritten. Raj met Simran, they fell in love and since then, we can't stop swooning over this epic love story. Celebrating #DDLJ25 pic.twitter.com/ocpyDv0c5N
— Yash Raj Films (@yrf) October 20, 202025 years ago on this day, the definition of romance was rewritten. Raj met Simran, they fell in love and since then, we can't stop swooning over this epic love story. Celebrating #DDLJ25 pic.twitter.com/ocpyDv0c5N
— Yash Raj Films (@yrf) October 20, 2020
शाहरुख म्हणाला, "बर्याच लोकांनी मला सांगितले होते की मी हिरोच्या कल्पनेपेक्षा वेगळा आहे. कदाचित मी इतका सुंदर नव्हतो, किंवा मी रोमँटिक भूमिकांसाठी जसा लागतो तसा नव्हतो. त्यामुळे मला असे वाटले की मी रोमँटिक भूमिकांसाठी योग्य नाही. शिवाय मी महिलांच्याबाबतीत लाजराही आहे आणि त्यामुळे रोमँटिक गोष्टी कशा बोलायच्या याबाबत मी साशंक होतो.''
२० ऑक्टोबर १९९५ रोजी प्रदर्शित झालेल्या आदित्य चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटामध्ये एसआरके आणि काजोल यांनी अभिनय केला होता. हा चित्रपट इंग्लंडमध्ये राहणाऱ्या राज (एसआरके) आणि सिमरन (काजोल) यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. याच चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पडद्यावर एनआरआय रोमान्सचा ट्रेंड सुरू केला आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा हा कायमचा भाग बनला. आज या चित्रपटाला २५ वर्षे पुर्ण होत असल्यामुळे यशराज फिल्म्सच्या वतीने सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि चित्रपटाच्या आठवणी पोस्ट करण्यात येत आहेत.
या चित्रपटापूर्वी शाहरुखने 'डर', 'बाजीगर' आणि 'अंजाम' असे चित्रपट केले होते, ज्यात त्याने निगेटिव्ह भूमिका साकारल्या होत्या. शाहरुख खानची रोमँटिक हिरोची प्रतिमा निर्माण करणारा डीडीएलजे हा चित्रपट होता.
शाहरुख पुढे म्हणाला, "यापूर्वी मी कोणत्याही प्रकारचे रोमँटिक पात्र साकारण्यास तयार नव्हतो. म्हणून जेव्हा आदि आणि यश (चोप्रा) जी यांनी या भूमिकेसाठी मला संधी दिली तेव्हा मी त्यांच्याबरोबर काम करण्यास उत्सुक होतो. परंतु मी हे कसे करू शकेन हे मला ठाऊक नव्हते. ठीक आहे, आजही माझ्यासाठी हा चित्रपट खूपच खास आहे. जेव्हा जेव्हा डीडीएलजेचे गाणे रेडिओ चॅनेलवर येते तेव्हा मी कधीच चॅनेल बदलत नाही. "
मुंबईतील मराठा मंदिर थिएटरमध्ये डीडीएलजे २० वर्षांहून अधिक काळ चालला होता. हा भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात प्रदीर्घ चाललेला चित्रपट ठरला होता.