ETV Bharat / sitara

‘धाकड’ मधील दिव्या दत्ताचा खतरनाक लूक झाला प्रकाशित! - दिव्या दत्ता धाकड चित्रपट लूक

हल्ली चित्रपटाच्या प्रोमोशन्सची पद्धत बदलली आहे. निर्माते चित्रपटाच्या शूटिंगबद्दल अत्यंत गुप्तता पाळतात. टीझर, ट्रेलर, विविध पोस्टर्स आदी एकापाठोपाठ एक असे हळूहळू प्रसारित करतात. दिव्या दत्ता चित्रपटातील तिचा रोहिणीचा खतरनाक लूक प्रदर्शित करताना म्हणाली की, ‘रोहिणी म्हणून माझा लूक सादर करत आहे. ती किती वाईट असू शकते याचे वर्णन देखील करत नाही.’

दिव्या दत्ता धाकड चित्रपट लूक
दिव्या दत्ता धाकड चित्रपट लूक
author img

By

Published : Jan 24, 2021, 7:40 PM IST

मुंबई - हल्ली चित्रपटाच्या प्रोमोशन्सची पद्धत बदलली आहे. निर्माते चित्रपटाच्या शूटिंगबद्दल अत्यंत गुप्तता पाळतात. बहुतेक शुटिंग्सदरम्यान सर्वांनाच मोबाईल फोन्स सेटवर आणायला बंदी असते, जेणेकरून कुठलीही माहिती बाहेर पडू नये. प्रोमोशन्समध्येसुद्धा सर्वच गोष्टी एकदम उघड करीत नाहीत. टीझर, ट्रेलर, विविध पोस्टर्स आदी एकापाठोपाठ एक असे हळूहळू प्रसारित करतात. ‘धाकड’ या कंगना रणौत अभिनित चित्रपटाचे पोस्टर आले, ज्यात कंगनाचा, त्यानंतर अर्जुन रामपालचा आणि आता दिव्या दत्ताचा लूक रिलीज करण्यात आला. दिव्याचा खतरनाक लूक चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढवतो.

हेही वाचा - अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे अभिनित 'शेजारी शेजारी' चित्रपटाला ३० वर्षे पूर्ण!

कंगना रणौतचा आगामी चित्रपट धाकड हा एक मेगा अ‍ॅक्शन-एंटरटेनर असून मोठ्या ‘स्केल’ वर बनविला जात आहे. यात कंगना महिला सिक्रेट एजन्टच्या भूमिकेत असेल व पहिल्यांदाच बॉलिवूडमधील एखादी नायिका अशी भूमिका साकारताना दिसेल. निर्माते-दिग्दर्शकाच्या मते ‘धाकड’ मधून महिला कलाकारांची मुख्य भूमिका असलेला अ‍ॅक्शन चित्रपट बनविण्याचा ट्रेंड सुरु होईल. कारण जगातील कोणत्याही ॲक्शन चित्रपटाला समर्थपणे टक्कर देऊ शकेल, अशी ॲक्शन-दृश्ये या चित्रपटात दिसणार आहे व हे सर्व एक महिला सिक्रेट एजंट अग्नी, जी भूमिका कंगना रणौत करीत आहे, करताना दिसणार आहे.

दिव्या दत्ता चित्रपटातील तिचा रोहिणीचा खतरनाक लूक प्रदर्शित करताना म्हणाली की, ‘रोहिणी म्हणून माझा लूक सादर करत आहे. ती किती वाईट असू शकते याचे वर्णन देखील करत नाही.’ सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, असायलम फिल्म्स आणि सोहेल मकलाय प्रॉडक्शन्स निर्मित ‘धाकड’ चे दिग्दर्शन रजनीश (रेझी) घई याने केले आहे. कंगना रणौतसोबत अर्जुन रामपाल, दिव्या दत्ता, महाअक्षय चक्रवर्ती, मनोज तिवारी आदी महत्त्वपूर्ण भूमिकांतून दिसतील.

‘धाकड’ येत्या दिवाळीत १ ऑक्टोबर २०२१ ला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - नवोदित समर्थक शिंदेचं 'करवली' गाणं सप्तसूर म्युझिकवर झालं लाँच!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.