मुबंई - भूमी पेडणेकरचा आज ३१ वा वाढदिवस ती घरी कुटुंबासोबत साजरा करणार आहे. लवकरच कोविड-१९ ची लस येवो आणि कोरोनावर उपाय सापडो याच शुभेच्छा असल्याचे भूमीने सांगितले.
कोरोनाच्या संक्रमणामुळे जे लोक ग्रस्त झाले आहेत आणि सध्याच्या या संकटामुळे जे लोक असुरक्षित झाले आहेत त्यांना थोडी शांतता मिळावी, त्यांच्या जीवनात आनंद यावा आणि खऱ्या अर्थाने यावर उपाय निघावा किंवा लस निर्माण व्हावी याच माझ्या या वर्षीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत, असे भूमीने सांगितले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
तिच्या वाढदिवसाच्या नियोजना बद्दल ती म्हणाली, "हा वाढदिवस खास आहे कारण मी यावेळी कोणालाही भेटणार नाही आणि घरीच कुटुंबासोबत राहणार आहे. ही अत्यंत सोपी आणि मुलभूत गोष्ट आहे. कोणतेही खास नियोजन नाही."
यावर्षी तिचे उत्सव "खूप वेगळे" असतील असे तिने सांगितले. "खरंतर वाढदिवस माझ्यासाठी मोठा असतो. मी अनेक लोकांना, प्रियजनांना सहभागी करुन घेते. मी खूप लाड करुन घेते, परंतु यावेळी मी आई आणि बहिणीसोबत राहणार आहे. माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत झूम कॉलवर राहणार आहे", असे ती म्हणाली.
लॉकडाऊनचा नेमका तिच्यावर कोणाता परिणाम झालाय? यावर ती म्हणाला, "मी खूप बिझी व्यक्ती आहे. मला कुटुंबियांना वेळ देणे आवडते पण मी कामावरही प्रेम करते, त्यामुळे मी सेट मिस करीत आहे. आपण सर्वजण पाहतोय की व्हायरसच्या सहवासात राहण्याचे संपूर्ण जग हळूहळू प्रयत्न करीत आहे."
हेही वाचा - ममता कुलकर्णीच्या जीवनावर बनतोय चित्रपट?
लॉकडाऊन दरम्यान भूमीला स्वत: ला व्यग्र ठेवण्याचे अनेक सर्जनशील मार्ग सापडले आहेत. तिने "स्वयंपाक आणि घरातील कामे" करण्याचा प्रयत्न केला.
"परंतु याशिवाय मी इथे आणि तिथे लिहिते, भरपूर पुस्तकं वाचते, चांगला आशय पाहते. मी भरपूर काम करते. मी ध्यान करते. मी बरीच डिजीटल कोलॅब्रेशन करीत आहे, त्यामुळे स्वतःला व्यग्र ठेवते," असे ती पुढे म्हणाली.