मुंबई - अभिनेत्री भूमी पेडणेकरची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिने ही माहिती चाहत्यांना दिली आहे. दरम्यान अभिनेता अर्जुन रामपाल याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्याने सोशल मीडियावरुन ही माहिती दिली. सध्या तो होम क्वारंटाईनमध्ये राहात असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे.
भूमीने शनिवारी सांगितले की, विषाणूची लागण झाल्यानंतर दहा दिवसांपेक्षा जास्त काळानंतर कोविड -१९ मधून बरी झाली आहे. ५ एप्रिल रोजी तिने आपल्याला कोरोना झाल्याचे सोशल मीडियावरुन सांगितले होते. तिला कोविडची सौम्य लक्षणे असल्यामुळे तिने क्वरंटाईन राहून उपचार घेतला. आता ती पूर्ण बरी झाली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
भूमी पेडणेकरने इन्स्टाग्रामवरुन आपले हेल्थ अपडेट चाहत्यांना दिले आहे. ''मी निगेटिव्ह आहे परंतु आयुष्याबद्दल पॉझिटिव्ह आहे'', असे तिने 'नो कोरोना' हॅशटॅग वापरुन लिहिले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला भूमी पेडणेकर करण जोहरच्या मिस्टर लेले या चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेता विक्की कौशलसोबत काम करीत होती. त्यावेळी तिला कोरोनाची लागण झाली होती.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलची केविड १९टेस्ट निगेटिव्ह आली आहे. आपल्या टेस्टच्या नवीन निदानाबद्दल शुक्रवारी विकीने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. विकीने आपले हेल्थ अपडेट इंस्टाग्रामवर फोटोसह शेअर केले आहे. एक हसरा फोटो पोस्ट करीत त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने निगेटिव्ह इतकेच लिहिले आहे
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अर्जुन रामपालनेही सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या चाहत्यांना माहिती दिली आणि आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले.
हेही वाचा - टायगरसोबत मालदिवमध्ये सुट्टी घालवत असलेल्या दिशा पाटनीचा बोल्ड फोटो
अर्जुनने आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. तो म्हणाला, "गेल्या 10 दिवसात माझ्याशी संपर्क साधलेल्या सर्वांना कृपया काळजी घ्या आणि आवश्यक खबरदारी घ्या. आमच्यासाठी हा अत्यंत धडकी भरवणारा काळ आहे. परंतु जर आम्ही थोड्या काळासाठी जागरूक आणि शहाणे राहिलो तर याचा दीर्घकालीन लाभ होईल. आम्ही एकत्रितपणे कोरोनाशी लढू शकतो! "
कोरोनाव्हायरसच्या दुसर्या लाटेमुळे बर्याच लोकांना संसर्ग झाला आहे आणि कोविड -१९ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. बॉलिवूडमध्ये काही आठवड्यांत काही सेलिब्रिटींच्या संसर्गाची लागण झाली आहे.
नुकतेच नील नितीन मुकेश, सोनू सूद, मनीष मल्होत्रा, कॅटरिना कैफ, अक्षय कुमार, गोविंदा, परेश रावल, आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि रोहित सराफ या कलाकारांची कोरोना टाटणी पॉझिटिव्ह आली होती. यापूर्वी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अर्जुन कपूर, मलायका अरोरा आणि इतर काही जणांनाही या विषाणूची लागण झाली होती.
हेही वाचा - हसरा फोटो शेअर करीत विकी कौशलने दिली कोविड निगेटिव्ह झाल्याची बातमी