नवी दिल्ली - अभिनेत्री कंगना रणौतचा त्रास कमी होत असल्याचे दिसत नाही. नवीन कृषी कायद्यांचा निषेध म्हणून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ट्विट करून त्यांना दहशतवादी म्हटले होते. त्यानंतर दिल्ली गुरुद्वारा समितीच्या वतीने कंगनाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. आता दिल्ली गुरुद्वारा समितीने दाखल केलेल्या तक्रारीवर सुनावणी घेत दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने बुधवारी पोलिसांना अॅक्शन टेकन रिपोर्ट (एटीआर) दाखल करण्याचे आदेश दिले.
कोर्टाने पोलिसांना या प्रकरणात काय घडले आहे ते २४ एप्रिलपर्यंत सांगण्यास सांगितले. हा आदेश कोर्टाने दिल्लीतील उत्तर एव्हेन्यू पोलिस स्टेशनला दिला आहे. कंगनाच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी दिल्ली कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत असा आरोप केला गेला आहे की, अवमानकारक ट्विटद्वारे विविध समुदायामध्ये अनादर पसरविला जात आहे.
आपल्याला माहिती असेल की, कंगना रणौतने शेतकरी आंदोलनाविरोधात ट्विट केले होते आणि शेतकऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी केली होती आणि पैशांनी आंदोलन केल्याचा आरोपही तिने केला होता. आता या प्रकरणाची सुनावणी २४ एप्रिल रोजी होईल.
अभिनेत्री कंगना रनौतच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर ती सध्या तिच्या 'धाकड' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. याशिवाय कंगनाचे नाव ‘तेजस’ चित्रपटाशीही जोडले गेले आहे, ज्यात ती एक महिला एअरफोर्स पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललितावर आधारित 'थलाईवी' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे आणि त्याचे पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे.
हेही वाचा - आमिर खानचे ‘आयटम सॉंग’, एली अवराम सोबत!