ETV Bharat / sitara

सीआयएसएफ जवानाने सलमान खानला अडवले, सर्व जण करताहेत कौतुक - सलमान खान टायगर 3 च्या शुटिंगसाठी सज्ज

सलमान खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात फोटोग्राफर्स त्याला पोज देण्यासाठी विनंती करताना दिसत आहेत.

सलमान खान
सलमान खान
author img

By

Published : Aug 20, 2021, 8:27 PM IST

मुंबई - सलमान खान त्याच्या आगामी 'टायगर 3' चित्रपटाच्या शूटिंगसाठी रशियाला रवाना झाला आहे. यादरम्यान, सलमान खान ब्लू डेनिम आणि ब्लॅक टी-शर्टसह लाल शूजमध्ये अतिशय डॅशिंग दिसत होता. आता सलमान खानचा विमानतळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सलमान जेव्हा विमानतळावर पोहोचला तेव्हा आत जाताना सीआयएसएफ अधिकाऱ्याने त्याला सुरक्षा तपासणीसाठी थांबवले. तपासल्यानंतर सलमान खानची एंट्री झाली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून लोक सीआयएसएफ अधिकाऱ्याचे खूप कौतुक करत आहेत.

व्हिडिओ क्लिपमध्ये दिसते की सलमान खान खूप शांत दिसत आहे, आणि हळूहळू टीमसह पुढे जात आहे. या दरम्यान, फोटोग्राफर त्याच्याकडे पोज देण्याची विनंती करत आहेत. सलमानने कोणालाही निराश केले नाही. सलमान खानच्या या व्हिडिओवर लोक मोठ्या प्रतिक्रिया देत आहेत आणि त्याच्यासह सीआयएसएफ अधिकाऱ्याचेही कौतुक करत आहेत.

एका युजरने व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना लिहिले, 'सीआयएसएफ जवानाने सलमानला ज्या प्रकारे रोखले ते पाहून छान वाटले.' दुसर्‍याने लिहिले: सीआयएसएफ जवान देखील स्टारसारखा दिसत आहे. सलमान खानच्या या व्हिडिओवर आणखी एकाने प्रतिक्रिया देताना लिहिले, 'आपले कर्तव्य पार पाडल्याबद्दल त्याला. विशेष म्हणजे, सलमान खान रशियामध्ये 'टायगर 3' चे शूटिंग सुमारे दोन महिने करणार आहे.

सलमान खानच्या आगामी कामाबद्दल बोलायचे तर 'टायगर' फ्रँचायझीचा हा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटात सलमानसोबत कॅटरिना आणि इमरान हाश्मी देखील दिसणार आहेत. इम्रान या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत आहे. सलमान शेवटचा 'राधे' या चित्रपटामध्ये दिसला होता.

हेही वाचा - ललित प्रभाकर, अभय महाजन व आलोक राजवाडे यांची ‘शांतीत क्रांती'!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.