ETV Bharat / sitara

मरुनही जगेल मी... राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त संचारी विजय मृत्यूनंतरही अवयवदानातून राहणार जीवंत

author img

By

Published : Jun 14, 2021, 5:35 PM IST

Updated : Jun 14, 2021, 6:35 PM IST

अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या अभिनेता संचारी विजयचा मोटरसायकल अपघातात मृत्यू झाला आहे. त्याने हेल्मेट घातले असते तर कदाचित त्याचा जीव वाचू शकला असता. त्याच्या निधनाने कन्नड फिल्म इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

Sanchari Vijay
अभिनेता संचारी विजय

बंगळूरू - हरहुन्नरी युवा कन्नड अभिनेता संचारी विजय याला अखेर मृत घोषित करण्यात आले आहे. शनिवार १२ तारखेला त्याला मोटरसायकलवरुन घरी परतत असताना भीषण अपघात झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. अखेर तो ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी जाहिर केल्यानंतर कन्नडसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत शोकलहर पसरली आहे.

Sanchari Vijay
राष्ट्रीय पुरस्कार विजेता संचारी विजय

असा झाला होता अपघात

अभिनेता संचारी विजय आणि त्याचा मित्र नवीन हे मोटरसायकलवरुन घरी परतत होते. यावेळी त्यांची मोटरसायकल घसरली आणि अपघात झाला. दोघांनीही हेल्मेट वापरले नसल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचार सुरू झाले. त्याच्या मेंदूत रक्ताची गुठळी झाल्यामुळे, शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि वयाच्या ३७ व्या वर्षी त्याने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्याचा मित्र नवीन याच्यावर उपचार सुरू असून त्याचा धोका टळला असल्याचे डॉक्टरनी सांगितले.

Sanchari Vijay
अवयवदानातून राहणार जीवंत

संचारी विजयचे होणार अवयवदान

संचारी विजय मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. विजयचे भाऊ सिद्धेश कुमार यांनी माध्यमांना सांगितले होते की कुटुंबाने अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. “डॉक्टरांनी आम्हाला माहिती दिली आहे की त्याचा मेंदू मृत झाला असून तो रिकव्हर होण्याची शक्यता नाही. आपणा सर्वांना माहितच आहे की त्याने नेहमीच समाजाच्या उन्नतीसाठी काम केले आहे. त्याने कोविड -१९ साथीच्या काळात मदतकार्यासाठी चोवीस तास काम केले होते. म्हणून आम्ही त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचा विश्वास आहे की यामुळे त्याला शांती मिळेल. तो मृत्यूनंतरही समाजाला मदत करत राहील. ज्यांनी त्याच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे प्रयत्न केले त्या प्रत्येकाचे आभार. ”

Sanchari Vijay
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त संचारी विजय

अल्पकाळात बहरलेली कारकिर्द

अभिनेता संचारी विजय याची कारकिर्द केवळ १० वर्षांची ठरली. २०११ मध्ये तो रंगाप्पा होगबिटना या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकला. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने कन्नड चित्रपटसृष्टीचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. २०१५ मध्ये आलेल्या 'नानू अवनाल्ला अवलु' या चित्रपटामुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली, विशेष म्हणजे या चित्रपटातील ट्रान्सजेंडरच्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्याला हा सर्वोच्च पुरस्कार बहाल करण्यात आला होता. दसावला, हरिव्हू, ओग्गारणे, किलिंग वीरप्पन, वर्थमाना आणि सिपायी हे त्याचे काही गाजलेले चित्रपट होते. त्याला अभिनाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

Sanchari Vijay
अभिनेता मोहनलालसोबत संचारी विजय

कोरोना संकटाच्या काळात विजयचे मोठे योगदान

कोरोनाच्या संकटानंतर अनेक अभिनेता लोकांच्या मदतीसाठी पुढे आले होते त्यामध्ये कन्नड अभिनेता संचारी विजय मागे नव्हता. रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबतच्या कार्यात तो पुढाकार घेऊन काम करीत होता. यासाठी त्याने आपल्या सोशल मीडिया पेजवरुन मोहीम चालवली होती. त्याची प्रेरणा घेऊन अनेक कन्नड कलाकारांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता.

Sanchari Vijay
चिरंजीवीसोबत संचारी विजय

गिरीष कर्नाड यांचा विजयवर प्रभाव होता

ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता गिरीष कर्नाड यांचा मोठा प्रभाव संचारी विजय याच्यावर होता. अलिकडेच त्याने कर्नाड यांच्या चरित्राचे ऑडिओ बुकसाठी वाचन केले होते. आजही स्टोरी टेलवर हे पुस्तक संचारी विजयच्या आवाजात उपलब्ध आहे.

हेही वाचा - राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता संचारी विजयचा अपघाती मृत्यू, ब्रेन डेड केले घोषित

Last Updated : Jun 14, 2021, 6:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.