मुंबई - उत्तर प्रदेशमधील हाथरस आणि बलरामपूर येथे सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनांबद्दल अभिनेता आयुष्मान खुराना यांनी चिंता व्यक्त केली आहे. तो म्हणाले, "हैरान झालोय, स्तब्ध झालोय आणि पूर्णपणे हादरुन गेलोय. हाथरसनंतर बलरामपूरमधून सामूहिक बलात्कार आणि हत्येची घटना उघडकीस आली आहे. ती भीषण आणि अमानवीय आहे."
''यासाठी दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. हे सर्व कधी थांबेल? आपल्या देशातील महिलांना सुरक्षा पुरवण्याच्या बाबतीत आम्ही दररोज अपयशी ठरत आहोत. महिला सुरक्षित ठेवण्यापेक्षा आपल्याला अजून बरेच काही करायचे आहे. आम्हाला आमच्या मुलांचे संगोपन चांगले करावे लागेल, " असेही त्याने म्हटलंय.
आयुष्मान अलीकडेच युनिसेफ इंडियाचा सेलिब्रेटी वकिल म्हणून निवडला गेला आहे. बाल हिंसाचार रोखण्यासाठी तो काम करत आहे. आयुष्यमान हा #फॉरएव्हरीचाइल्ड साठी अधिकारांबाबत भाष्य करताना दिसेल.