मुंबई - अभिनेत्री परिणीती चोप्रा आज गुरुवारी आपला वाढदिवस साजरा करीत आहे. हा दिवस तिच्यासाठी आणखी खास बनवण्यासाठी बॉलिवूडच्या अनेक नामवंत कलाकारांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परिणीतीची चुलत बहीण प्रियंका चोप्रा जोनास हिने दोघींचा फोटो शेअर करीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
Happy Birthday Tisha
— PRIYANKA (@priyankachopra) October 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Sending you a biiiiiig hug and 💋💋
Miss you tons ❤️@ParineetiChopra pic.twitter.com/we9TquMZgP
">Happy Birthday Tisha
— PRIYANKA (@priyankachopra) October 22, 2020
Sending you a biiiiiig hug and 💋💋
Miss you tons ❤️@ParineetiChopra pic.twitter.com/we9TquMZgPHappy Birthday Tisha
— PRIYANKA (@priyankachopra) October 22, 2020
Sending you a biiiiiig hug and 💋💋
Miss you tons ❤️@ParineetiChopra pic.twitter.com/we9TquMZgP
अभिनेता आयुष्मान खुरानाने आपल्या 'मेरी प्यारी बिंदू' चित्रपटातील सहकलाकार परिणीती हिला इंस्टाग्रामवर शुभेच्छा दिल्यात. अभिनेत्री अथिया शेट्टीनेही परिणीतीच्या या खास दिवशी प्रेम, 'रोशनी' आणि 'उमंग' यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 'जबरीया जोडी' आणि 'हंसी तो फांसी' या चित्रपटात परिणीतीसोबत भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थ मल्होत्रानेही सोशल मीडियातून शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये परिणीतीचे फोटो शेअर करताना लिहिले आहे, "वाढदिवसाच्या शुभेच्छा परी. नेहमी चमकत राहा."
परिणीती सध्या सायना नेहवालच्या आगामी बायोपिक 'सायना'मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. यासाठी ती खूप मेहनत घेत आहे. याशिवाय ती याच नावाच्या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या 'द गर्ल ऑन द ट्रेन' या मनोवैज्ञानिक थ्रिलरमध्येही दिसणार आहे. हा चित्रपट पॉला हॉकिन्सच्या २०१५ च्या पुस्तकावर आधारित आहे.