मुंबई - सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआयचे पथक तपास करीत आहे. 14 जून रोजी सुशांतने आत्महत्या केली होती. त्यानंतर सुशांतचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी मुंबईतील कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला होता. सुशांतच्या आत्महत्येनंतर दुसऱ्या दिवशी कूपर रुग्णालयातील शवागृहात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीही गेली होती, असे तपासात समोर आले आहे.
रुग्णालयाच्या शवागृहात रिया चक्रवर्ती हिने तब्बल 45 मिनिटात घालवली होती. शवागृहासारख्या ठिकाणी पोलीस किंवा कर्मचाऱ्यांशिवाय इतरांना परवानगी नसताना आत जाता येत नाही. असे असतानाही रिया चक्रवर्तीने त्या ठिकाणी 45 मिनिटात कशी काय घालवली? याचा तपास करण्यासाठी सीबीआयकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रकरणी लवकरच सीबीआयकडून कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता व सुशांत सिंग च्या पोस्टमार्टम रिपोर्ट तयार करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी केली जाणार आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभागाला कारणे दाखवा नोटीसही पाठवली जाणार आहे. रिया चक्रवर्ती ही तब्बल 45 मिनिटे सुशांतच्या मृतदेहाजवळ उभी होती आणि याची माहिती पोलिसांना होती का? याचाही तपास सीबीआयकडून केला जाणार आहे.
हेही वाचा : 'गरज पडल्यास रिया चक्रवर्ती तिच्या रक्ताचे नमुने देण्यास तयार'