मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सीबीआयच्या विशेष तपास पथकाने सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानी याची बुधवारीही चौकशी सुरू ठेवली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोला आता गेल्या वर्षापासून अभिनेत्याच्या मृत्यूपर्यंतच्या सर्व घटनांबद्दल जाणून घ्यायचे आहे. सीबीआय पाचव्यांदा पिठाणीची चौकशी करीत आहे.
मुंबईतील सांताक्रूझ येथील डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये सीबीआयचे पथक मुक्कमाला आहे. इथेच ते चौकशीसाठी संबंधितांन बोलवत आहेत. मंगळवारी सुशांतचा पर्सनल स्टाफ नीरजसिंग याच्यासह पिठाणी याची काही तास चौकशी केली होती.
सीबीआयच्या सूत्राने सांगितले की एजन्सी आता सुशांत आणि रिया यांच्या युरोपहून परतल्यानंतरचा घटमनाक्रम जाणून घेणार आहे. सुशांत मुंबईच्या बांद्रे येथील निवासस्थानी मृत अव्थेत १४ जून रोजी आढळला होता. त्याच्या वडिलांनी केके सिंह यांनी आपल्या कुटुंबासह रिया चक्रवर्ती हिच्यासह काहींवर मुलाच्या आत्महत्येचा आरोप लावला आहे.
सुशांतला डॉक्टरांकडे उपचारासाठी कोण घेऊन जात होते आणि त्याच्या कुटुंबीयांना त्याच्याशी बोलण्याची परवानगी का देण्यात आली नव्हती हेही सीबीआयच्या टीमला जाणून घ्यायचे आहे.
तसेच सुसांतचे वडिल के के सिंह यांनी रियाला कॉल केला होता आणि सुशांतच्या तब्येतीबद्दल विचारले होते. मात्र रिया आणि सुशांतची एक्स मॅनेजर श्रृती मोदी हिने याकडे दुर्लक्ष केले होते. इतकेच नाही तर के के सिंह यांच्या मेसेजला उत्तर देणेही टाळले होते. याबद्दलही सीबीआयला जाणून घ्यायचे आहे.
पिठाणी याच्याशिवाय सीबीआयने नीरज, दीपेश सावंत, सुशांतचा सीए संदीप श्रीधर, लेखापाल रजत मेवाती, कूपर रुग्णालयातील डॉक्टर आणि 14 जूनला कर्तव्यावर असलेल्या पोलिसांचीही बातचीत केली.
सीबीआयने 6 ऑगस्टला याप्रकरणी एफआयआर नोंदविला होता. बिहार सरकारच्या विनंतीनंतर सीबीआयला केंद्र सरकारकडून या प्रकरणाची चौकशी करण्याची परवानगी मिळाली आहे.